सामूहिक विवाह सोहळा आयोजनासाठी नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कन्यादान योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी नामांकित नोंदणीकृत सेवाभावी संस्था व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे. सन २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जोडप्यांना २५ हजार रुपये, तर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे २५०० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. प्रस्तावासोबत संस्थेचा नोंदणी दाखला, संस्थेच्या घटनेची प्रत, संचालक मंडळाची यादी, अध्यक्ष व सचिव यांची आधारकार्डाची प्रत जोडावी. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. संस्थेने कोणताही आर्थिक गैरव्यवहार केला नसल्याचे अथवा संस्थेवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे १०० रुपयांच्या स्टँप पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. संस्थेने वर व वधूचे विवाह नोंदणी अर्ज शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक राहील. प्रस्ताव व लाभार्थ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्यास संस्थेची निवड रद्द करण्यात येईल व अनुदान देण्यात येणार नाही. सहभागी जोडप्यांना विवाहाच्या दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. संस्थेने सादर करावयाचा प्रस्ताव व त्यातील अटी-शर्ती या ३ मार्च २००४, १८ फेब्रुवारी २००९ व १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट 'अ' व 'ब' नुसार असाव्यात. मंजूर लक्षांकानुसार पात्र लाभार्थी न मिळाल्यास लक्षांक वर्गवारीत बदल करण्याचे अधिकार व इतर आनुषंगिक अधिकार प्रकल्प अधिकारी यांच्याकडे राहतील. याव्यतिरिक्त अधिकच्या अटी व शर्ती संस्थांवर बंधनकारक राहतील. संस्थेची निवड अर्जाची ज्येष्ठता, निधीची उपलब्धता, प्राप्त लक्षांक व क्षेत्रानुसार निश्चित केलेल्या निकषांवर केली जाईल. संस्थेची निवड प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत नियमाप्रमाणे होईल. निवड झालेल्या संस्थांनी विवाह सोहळ्याची तारीख आणि निमंत्रण पत्रिका विवाहाच्या १५ दिवस आधी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. संस्थेने विवाह सोहळ्याचे छायाचित्रण, चलचित्रफीत आणि फोटो अहवाल जिओटॅग लोकेशनसह सादर करावा. अनुदानाची रक्कम वर व वधूच्या संयुक्त खात्यात तसेच संस्थेच्या आधार लिंक असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाईल. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची अंमलबजावणी व तपासणी केली जाईल. सन २०२५-२६ साठी टीएसपी क्षेत्रासाठी १५ व ओटीएसपी क्षेत्रासाठी १५ लक्षांक मंजूर आहेत. प्रत्येक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी किमान १० जोडपी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या संस्थांनी कन्यादान योजनेच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्य करणे बंधनकारक आहे. योजनेतील सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा लिहून द्यावा लागेल. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचा अर्ज आवश्यक आहे. वधू-वरांपैकी किमान एक जण अनुसूचित जमातीचा असावा. यासाठी सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला, जन्मतारखेसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, आधार लिंक असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, यापूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, अधिवास दाखला, वर व वधूचा हा प्रथम विवाह असल्याचे व त्यांना अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वराचे वय किमान २१ वर्षे व वधूचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन न केल्याचे प्रतिज्ञापत्र वर व वधूने १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांनी आपले अर्ज निवड झालेल्या संस्थेकडे सादर करावेत.

- Post by कर्जत लाईव्ह1
- थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.4
- रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?1