माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा हिंगोली, (दि. २८ ) पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी सर्वांनी करावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आरोग्य विकासाचा ध्यास घेत सुरू करण्यात आलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकाक्षी अभियानाचा पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे २८ रोजी मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. पंचायत समिती न्यायालयातील सभागृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याला विविध विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या सख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष-स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गट विकास अधिकारी माया वानखडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड सहाय्यक गट विकास अधिकारी विष्णू भोंजे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात विवेक गायकवाड यानी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना, प्रथम स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणित्यानतर संपूर्ण गावाच्या आरोग्याची जबाबदारी उचलणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ग्राम पंचायत अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करत ५९ निर्देशाकाची पूर्तता करून जिल्ह्याचे नाव राज्य स्तरावर अग्रक्रमांकावर आणण्याचे आवाहन त्यानी केले. मेहनतीला पर्याय नाहीः प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करून माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची जास्तीत जास्त जनजागृती करणे यासाठी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करावे हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायत ह्या तिथी मुक्त अभियानात आल्या पाहिजेत आपलं "गाव प्रदूषण मुक्त गाव", "प्लास्टिक मुक्त गाव" आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्ड आणि आभा कार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे 'प्रश्न मनाचे' या पुस्तकाचे, छोटी सोच, पाव की मुछ. आणि गणपती बाप्पाचे उदाहरण असे अनेक प्रकारचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या भरीव पुरस्कारांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीसाठी राज्य-स्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी रुपये, विभागस्तरावर प्रथम १ कोटी, तर जिल्हास्तरावर प्रथम २५ लाख रुपयापर्यंतचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुरणालयासाठीही आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी असे सांगितले की माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे महत्त्वाची भूमिका आहे. आशा वर्कर यांनी व्यवस्थित नियोजन करून सुरळीतपणे कामे करावे, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सहकार्य करून अभियान यशस्वी करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची सविस्तर माहिती देऊन ग्रामपंचायत अधिकारी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले अभियान यशस्वी राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी करून ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभा आयोजित करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येणार आहे. प्रास्ताविकेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी माझगाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची सविस्तर माहिती दिली तर गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा हिंगोली, (दि. २८ ) पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे द्वितीय सेवा हक्क २८ एप्रिल दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी सर्वांनी करावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आरोग्य विकासाचा ध्यास घेत सुरू करण्यात आलेल्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकाक्षी अभियानाचा पंचायत समिती कार्यालय हिंगोली येथे २८ रोजी मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. पंचायत समिती न्यायालयातील सभागृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याला विविध विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या सख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष-स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गट विकास अधिकारी माया वानखडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड सहाय्यक गट विकास अधिकारी विष्णू भोंजे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात विवेक गायकवाड यानी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना,
प्रथम स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणित्यानतर संपूर्ण गावाच्या आरोग्याची जबाबदारी उचलणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ग्राम पंचायत अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करत ५९ निर्देशाकाची पूर्तता करून जिल्ह्याचे नाव राज्य स्तरावर अग्रक्रमांकावर आणण्याचे आवाहन त्यानी केले. मेहनतीला पर्याय नाहीः प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी गावामध्ये ग्रामसभा आयोजित करून माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची जास्तीत जास्त जनजागृती करणे यासाठी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन काम करावे हिंगोली तालुक्यातील 111 ग्रामपंचायत ह्या तिथी मुक्त अभियानात आल्या पाहिजेत आपलं "गाव प्रदूषण मुक्त गाव", "प्लास्टिक मुक्त गाव" आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्ड आणि आभा कार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे 'प्रश्न मनाचे' या पुस्तकाचे, छोटी सोच, पाव की मुछ. आणि गणपती बाप्पाचे उदाहरण असे अनेक प्रकारचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या भरीव पुरस्कारांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीसाठी राज्य-स्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी रुपये, विभागस्तरावर प्रथम १ कोटी, तर जिल्हास्तरावर प्रथम २५ लाख रुपयापर्यंतचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य
केंद्र आणि ग्रामीण रुरणालयासाठीही आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी असे सांगितले की माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे महत्त्वाची भूमिका आहे. आशा वर्कर यांनी व्यवस्थित नियोजन करून सुरळीतपणे कामे करावे, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सहकार्य करून अभियान यशस्वी करावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची सविस्तर माहिती देऊन ग्रामपंचायत अधिकारी आशा वर्कर आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले अभियान यशस्वी राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी महाराष्ट्र सेवा हक्क याविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष प्रचार प्रसिद्धी करून ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभा आयोजित करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येणार आहे. प्रास्ताविकेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी माझगाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची सविस्तर माहिती दिली तर गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते
- Post by Sk Chand1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- कछरा का दिकत1
- Post by Today One Live1
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा1
- Post by Today One Live1