बीडच्या विकासाला नवी गती! ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी! बीडच्या विकासाला नवी गती! ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी! आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विकासाच्या या प्रवासात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावर भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोणतेही काम ₹१५ लाखांपेक्षा कमी नसावे, तसेच कामांचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. जिल्हा नियोजनांतर्गत जिल्हा परिषद व इतर यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकासकामांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला. बैठकीतील प्रमुख निर्णय : ▪️ पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतन केंद्र इमारत बांधकामासाठी ₹५.२७ कोटी मंजूर. ▪️ साकूड येथील पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठा योजनेसाठी ₹२.९९ कोटी मंजूर. ▪️ १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ₹४.८९ कोटी मंजूर. ▪️ जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेस विशेष निधी. ▪️ २०२५-२६ मध्ये वन विभागामार्फत ४७५.४ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड पूर्ण; येत्या काळात आणखी २६३.३० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट. ▪️ हरित बीड वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट. ▪️ ग्रामपंचायत जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटी विशेष अनुदान; ९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींची कामे.▪️ ऊर्जा विकास अंतर्गत ६१ कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा साधन विकासासाठी ₹१२ कोटी मंजूर. ▪️ बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ₹२ कोटी मंजूर; एकूण प्रकल्प खर्च ₹४.९५ कोटी. ▪️ कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद. यावेळी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा लोगो व शुभंकराचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह विविध विकासविषयक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी सूचना व मागण्या मांडल्या. अतिवृष्टीग्रस्तांना मदत,
बीडच्या विकासाला नवी गती! ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी! बीडच्या विकासाला नवी गती! ₹६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी! आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विकासाच्या या प्रवासात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विकासकामांमध्ये
पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावर भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोणतेही काम ₹१५ लाखांपेक्षा कमी नसावे, तसेच कामांचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. जिल्हा नियोजनांतर्गत जिल्हा परिषद व इतर यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकासकामांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला. बैठकीतील प्रमुख
निर्णय : ▪️ पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतन केंद्र इमारत बांधकामासाठी ₹५.२७ कोटी मंजूर. ▪️ साकूड येथील पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठा योजनेसाठी ₹२.९९ कोटी मंजूर. ▪️ १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ₹४.८९ कोटी मंजूर. ▪️ जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेस विशेष निधी. ▪️ २०२५-२६ मध्ये वन विभागामार्फत ४७५.४ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड पूर्ण; येत्या काळात आणखी २६३.३० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट. ▪️ हरित बीड वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट. ▪️ ग्रामपंचायत जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटी विशेष अनुदान;
९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींची कामे.▪️ ऊर्जा विकास अंतर्गत ६१ कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा साधन विकासासाठी ₹१२ कोटी मंजूर. ▪️ बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ₹२ कोटी मंजूर; एकूण प्रकल्प खर्च ₹४.९५ कोटी. ▪️ कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद. यावेळी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा लोगो व शुभंकराचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह विविध विकासविषयक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी सूचना व मागण्या मांडल्या. अतिवृष्टीग्रस्तांना मदत,
- हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.1
- *बद्रीनाथ में चोरी करने वाले के पास मिला सोना-चांदी:* आज खत्म हो रही रिमांड; PA ने घर में छिपाई थी चांदी की मूर्ति-विदेशी करेंसी बद्रीनाथ धाम के बहुचर्चित चढ़ावा चोरी मामले में मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल की 4 दिनों की पुलिस कस्टडी रिमांड आज (31 जुलाई 2026) समाप्त हो रही है। चमोली पुलिस की विशेष जांच टीम (SIT) ने रिमांड के दौरान आरोपी के बद्रीनाथ और देहरादून स्थित ठिकानों पर ताबड़तोड़ छापेमारी कर भारी मात्रा में चोरी का सामान और संपत्तियों के दस्तावेज बरामद किए हैं।छापेमारी में बरामद हुआ 'खजाना'बद्री-केदार मंदिर समिति (BKTC) के अध्यक्ष के पूर्व निजी सहायक (PA) प्रमोद नौटियाल के पास से मिली सामग्रियां इस प्रकार हैं:मूर्तियां और धार्मिक वस्तुएं: बद्रीनाथ स्थित नीलकंठ वीवीआईपी गेस्ट हाउस के सरकारी आवास से भगवान नारायण की एक चांदी की मूर्ति, चांदी का नाग और मंदिर का पवित्र शालिग्राम पत्थर बरामद हुआ है।विदेशी और भारतीय करेंसी: तलाशी में 500-500 रुपये के नोटों की गड्डियों के साथ 150 नोट नेपाली करेंसी (विदेशी मुद्रा) और चांदी के सिक्के मिले हैं। ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- उपसंचालकांचा आदेश असतानाही शिक्षकांची नियुक्ती नाही? सामाजिक संघटनांचे निवेदन व मागणी नेकनूर येथील डी.एड महाविद्यालय येथे शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याचे निवेदन सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले1
- अमरापुर येथील सुवर्ण बिंदू अर्बन निधी लिमिटेड पतसंस्था बंद खाते दारांना घातला कोटीचा गंडा पतसंस्था बंद करून संचालक फरार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण1
- जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले1
- उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन उपळी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन वडवणी, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोलीस चौकी अथवा पोलीस दूरक्षेत्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भात उपळी येथील सौ. रूपाली कचरे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयाचा तसेच महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ मधील तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस चौकी अथवा दूरक्षेत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, उपळी परिसरात गेल्या पाच वर्षांत ३१ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, महिला, विद्यार्थिनी व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपळी येथे तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आणि पोलीस चौकी सुरू करण्यास झालेल्या विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनानंतर उपळी परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत शासन व गृह विभाग कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील धामणा नदीला पूर; कमी उंचीच्या पुलावरून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास! भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील धामणा धरणाच्या नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात ही समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने पुलाची उंची वाढवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.1