पौष्टिक तृणधान्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी नांदेडच्या कृषि महोत्सवाला दिली खास चव”! पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे पारितोषिक वितरण नांदेड, १७ मार्च:- नांदेड येथील नवा मोंढा मैदान येथे १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नांदेड जिल्हा कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाजरी, राजगिरा, नाचणी, वरई, भगर यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सादर केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सुरेखा कुलकर्णी (विभाग प्रमुख, होम सायन्स, केआरएम महिला महाविद्यालय, नांदेड) व प्रा. अलका पवळे (कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी) यांनी केले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर (नाचणी व भगर लाडू) द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड (भगर आप्पे व इडली) तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड (नाचणी ढोकळा) तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेवानिवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलगेकर, दत्तकुमार कळसाईत (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड), कैलास वानखेडे (कृषी उपसंचालक), अनिल शिरफुले (उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेड) व सौ. अर्चना गुंजकर (प्रकल्प उपसंचालक, आत्मा) यांच्या हस्ते करण्यात आले.

- Post by Today One Live1
- वादळी पावसाचा तडाखा; हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिमायतनगर शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. 🌳 अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद ⚡ विजवाहिनी तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित 🌙 नागरिकांना रात्रभर अंधारातच काढावी लागली 🌾 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 🥭 आंबा, चिकू फळबागांना फटका 🌾 उन्हाळी ज्वारी, वैरण जमीनदोस्त 🌾 काढणीस आलेले गहू धोक्यात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. 🙏 शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हीच अपेक्षा #Himayatnagar #RainAlert #StormDamage #FarmersLoss #Agriculture MaharashtraNews BreakingNews WeatherUpdate SupportFarmers NNLDigitalMedia1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- हिमायतनगरात आंदोलन तीव्र – ‘ रविवार बंद’ चा इशारा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. 👉 “जागा मिळेपर्यंत माघार नाही” – उपोषणकर्त्यांचा निर्धार 👉 नगरपंचायतीच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये संताप 👉 प्रहार जनशक्तीकडून रविवारी हिमायतनगर बंदचा इशारा 🔥 वाढता पाठिंबा… वाढतं आंदोलन… निर्णयाची प्रतीक्षा! #Himayatnagar #ShivajiMaharaj #HimayatnagarBandh #Prahar #Maharashtra BreakingNews MarathiNews LocalNews1