logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वीजतारांच्या घर्षणाने तीन एकर गहू जळून खाक दोन लाखांचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला उमरखेड, दि. १० : तालुक्यातील नागापूर रूपाला शिवारात मंगळवारी दहा मार्चला दुपारी चारच्या सुमारास लोंबकळणाऱ्या जिवंत वीजतारांच्या घर्षणातून उडालेल्या ठिणगीमुळे तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे उभे पीक सुदैवाने आगीपासून बचावले आहे. नागापूर रूपाला शिवारात रेहाना सय्यद अख्तर आणि रोहित तामसकर यांची शेती आहे. रेहाना यांच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या जिवंत तारा खूप खाली लोंबकळत होत्या. मंगळवारी जोराचा वारा सुटल्याने या तारांचे एकमेकांशी घर्षण झाले आणि उडालेल्या ठिणग्या थेट खालील गव्हावर पडल्या. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. उपस्थित शेतकरी आणि मजुरांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. या भीषण दुर्घटनेत रेहाना अख्तर यांचा दोन एकर आणि रोहित तामसकर यांचा एक एकर असा एकूण तीन एकर गहू जळून पूर्णपणे नष्ट झाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

2 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
2 hrs ago
a0de943a-baf4-4cc1-b9c8-641c3b81c755

वीजतारांच्या घर्षणाने तीन एकर गहू जळून खाक दोन लाखांचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला उमरखेड, दि. १० : तालुक्यातील नागापूर रूपाला शिवारात मंगळवारी दहा मार्चला दुपारी चारच्या सुमारास लोंबकळणाऱ्या जिवंत वीजतारांच्या घर्षणातून उडालेल्या ठिणगीमुळे तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाले. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे उभे पीक सुदैवाने आगीपासून बचावले आहे. नागापूर रूपाला शिवारात रेहाना सय्यद अख्तर आणि रोहित तामसकर यांची शेती आहे. रेहाना यांच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या जिवंत

430e08d1-ea88-4d64-81dd-e29af1e90625

तारा खूप खाली लोंबकळत होत्या. मंगळवारी जोराचा वारा सुटल्याने या तारांचे एकमेकांशी घर्षण झाले आणि उडालेल्या ठिणग्या थेट खालील गव्हावर पडल्या. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. उपस्थित शेतकरी आणि मजुरांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. या भीषण दुर्घटनेत रेहाना अख्तर यांचा दोन एकर आणि रोहित तामसकर यांचा एक एकर असा एकूण तीन एकर गहू जळून पूर्णपणे नष्ट झाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. “मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
    3
    नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांचे अमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. ग्रामपंचायतमधील विविध प्रश्न व अनियमिततेबाबत सर्व पुरावे सादर करूनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
“मी गावचा लोकप्रतिनिधी असूनही मला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
    user_Prashant singanwad
    Prashant singanwad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾 वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. #Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾
    1
    अवकाळी पावसाच्या धास्तीने हिमायतनगर शहर व तालुका परिसरात गहू काढणीला वेग आला आहे. 🌾
वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी घाईगडबडीत गहू काढणी करत आहेत. मजूर टंचाईमुळे अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या माध्यमातून काढणी केली जात असून प्रति एकर सुमारे २००० रुपये खर्च येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतांतील गहू आडवा पडल्याने उत्पादनात घट होत आहे. मेहनत आणि खर्च वाढूनही उतारा कमी येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
#Himayatnagar #WheatHarvest #FarmersIssue #UnseasonalRain #MaharashtraFarmers AgricultureNews FarmerProblems HarvestSeason 🌾
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • # पत्रकार परिषद#news#hadagaonnrws#nanded#hadagaon#
    1
    # पत्रकार परिषद#news#hadagaonnrws#nanded#hadagaon#
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    18 hrs ago
  • बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    1
    बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी
बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.