कमी गुणांची सल आयुष्यभर राहते - मुख्याधिकारी झंवर महिला मंडळ शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व निरोप समारंभ संपन्न चोपडा -(प्रतिनिधी) क्रिकेटच्या सामन्यात कॅच सोडणे ही केवळ एक चूक नसते तर ते मॅच सोडणे असते.आयुष्यात येणारी संधी नका सोडू , संधी सोडली की आयुष्यभर दुःख सहन करावे लागते. कमी गुणांची सल आयुष्यभर राहते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील परीक्षा हा तणावाचा नाही तर आनंदाचा भाग आहे, असे सांगत चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी क्रिकेट खेळातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आयोजित इ. १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा व निरोप समारंभात बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश वाघजाळे, संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. रमेश वाघजाळे म्हणाले, गरिबी, ग्रामीण भागातील असणे, एखाद्या विषयाबद्दल असणारी भीती आणि मनातील न्यूनगंड काढून टाका. यश बुद्धीच्या वापरावर अवलंबून असतो. स्वप्न मोठी बघावी त्यामुळे प्रयत्नांना धार येते. विद्यार्थ्यांनी मोटारसायकल, मोबाईल पासून दूर राहा व चांगली संगत ठेवावी. सहवासाने माणसाचे आयुष्य घडते. मी करु शकतो या मंत्राचा ध्यास मनी कायम ठेवल्यास नक्कीच यश मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, छाया गुजराथी यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अनिल महाजन यांनी तर प्रास्ताविक सुनील पाटील यांनी व आभार प्रदर्शन चंद्रकांत चौधरी यांनी केले. याप्रसंगी वैष्णवी पाटील, कनक नहाले, खुशी पाटील व पियूष बारी या विद्यार्थ्यांनी तसेच संजय बारी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कमी गुणांची सल आयुष्यभर राहते - मुख्याधिकारी झंवर महिला मंडळ शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व निरोप समारंभ संपन्न चोपडा -(प्रतिनिधी) क्रिकेटच्या सामन्यात कॅच सोडणे ही केवळ एक चूक नसते तर ते मॅच सोडणे असते.आयुष्यात येणारी संधी नका सोडू , संधी सोडली की आयुष्यभर दुःख सहन करावे लागते. कमी गुणांची सल आयुष्यभर राहते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील परीक्षा हा तणावाचा नाही तर आनंदाचा भाग आहे, असे सांगत चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी क्रिकेट खेळातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आयोजित इ. १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा व निरोप समारंभात बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश वाघजाळे, संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. रमेश वाघजाळे म्हणाले, गरिबी, ग्रामीण भागातील असणे, एखाद्या विषयाबद्दल असणारी भीती आणि मनातील न्यूनगंड काढून टाका. यश बुद्धीच्या वापरावर अवलंबून असतो. स्वप्न मोठी बघावी त्यामुळे प्रयत्नांना धार येते. विद्यार्थ्यांनी मोटारसायकल, मोबाईल पासून दूर राहा व चांगली संगत ठेवावी. सहवासाने माणसाचे आयुष्य घडते. मी करु शकतो या मंत्राचा ध्यास मनी कायम ठेवल्यास नक्कीच यश मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, छाया गुजराथी यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अनिल महाजन यांनी तर प्रास्ताविक सुनील पाटील यांनी व आभार प्रदर्शन चंद्रकांत चौधरी यांनी केले. याप्रसंगी वैष्णवी पाटील, कनक नहाले, खुशी पाटील व पियूष बारी या विद्यार्थ्यांनी तसेच संजय बारी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- Post by SamirQureash Quresh1
- आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती कशी केली तालुक्यातील भवन गावाजवळ छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग वर हॉटेल राहुल भवन जवळ अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली यामध्ये सिताराम पालोदकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे अन्य दोघे गंभीर जखमी आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे1
- मेहकर::मेहकरात राष्ट्रगौरव रथ यात्रेचे जंगी स्वागत; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयासमोर जल्लोष1
- देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे1
- खामगाव : तालुक्यातील जयपूर लांडे येथे शासकीय कामगार किट वाटपाच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला असून, भाजप पदाधिकाऱ्यांकडून केवळ आपल्या जवळच्या व्यक्तींचेच फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगाच्या भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे.जयपूर लांडे येथे हे फॉर्म स्वीकारत असताना, तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठराविक लोकांचेच फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.जेव्हा इतर सामान्य कामगार आणि ग्रामस्थ आपले फॉर्म घेऊन पोहोचले, तेव्हा त्यांचे फॉर्म स्वीकारण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाब विचारला असता, पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या पसंतीचे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचेच फॉर्म घेतले जात आहेत,सामान्य आणि गरजू कामगारांना डावलले जात आहे,शासकीय योजनेचे रूपांतर राजकीय कार्यक्रमात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.या वादादरम्यान झालेला संवाद काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला असून, ती क्लिप आता तालुक्यात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पदाधिकाऱ्यांचा अरेरावीचा सूर आणि ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे जयपूर लांडे परिसरात तणावाचे वातावरण असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.1
- शांतता आणि उत्साह! खामगावात शिवजयंतीसाठी चोख बंदोबस्त.1
- Post by SamirQureash Quresh4
- बुलडाणा:::भाजपने माझ्या विधानाचा विपर्यास थांबवा; काँ प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा घणाघात.1
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1