इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडतर्फे आयोजित देशपातळीवरील परीक्षेमध्ये कोपरगाव येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलने आपली चमक कायम राखली आहे. या विद्यालयातील तब्बल १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या घवघवीत यशाची दखल घेत शाळेला 'गोल्डन स्कूल ऑफ अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. गणित, विज्ञान, इंग्रजी, कला, संगणक आणि जनरल नॉलेज या विषयांच्या ऑलिंपियाड परीक्षेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, १४ विद्यार्थी एक्सलन्स अवॉर्ड, ३८ विद्यार्थी गोल्ड मेडल, ३७ विद्यार्थी सिल्वर मेडल आणि ३६ विद्यार्थी ब्राँझ मेडलचे मानकरी ठरले आहेत. या यशात श्लोक गंगापूरकर, चैतन्य घोडके, साई घोडके, आरव नानेकर, प्रणव बदाडे आणि यशवंत जाधव यांनी विशेष स्थान मिळवले. आत्मा मालिक पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेले सूक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विशेष शिबिरे, नैदानिक चाचण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हेच या यशाचे गमक असल्याचे सांगण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आणि मीरा पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नंदकुमार सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आत्मा मालिक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केवळ राज्यच नव्हे तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या कामगिरीचा दबदबा निर्माण केला आहे. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश संपादन करू शकतात, हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडतर्फे आयोजित देशपातळीवरील परीक्षेमध्ये कोपरगाव येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलने आपली चमक कायम राखली आहे. या विद्यालयातील तब्बल १३१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या घवघवीत यशाची दखल घेत शाळेला 'गोल्डन स्कूल ऑफ अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. गणित, विज्ञान, इंग्रजी, कला, संगणक आणि जनरल नॉलेज या विषयांच्या ऑलिंपियाड परीक्षेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये ६ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत, १४ विद्यार्थी एक्सलन्स अवॉर्ड, ३८ विद्यार्थी गोल्ड मेडल, ३७ विद्यार्थी सिल्वर मेडल आणि ३६ विद्यार्थी ब्राँझ मेडलचे मानकरी ठरले आहेत. या यशात श्लोक गंगापूरकर, चैतन्य घोडके, साई घोडके, आरव नानेकर, प्रणव बदाडे आणि यशवंत जाधव
यांनी विशेष स्थान मिळवले. आत्मा मालिक पॅटर्न अंतर्गत करण्यात आलेले सूक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विशेष शिबिरे, नैदानिक चाचण्या आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हेच या यशाचे गमक असल्याचे सांगण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आणि मीरा पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. नंदकुमार सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आत्मा मालिक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केवळ राज्यच नव्हे तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या कामगिरीचा दबदबा निर्माण केला आहे. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश संपादन करू शकतात, हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये ग्रामपंचायतीने गारुडी आणि मातंग समाजाच्या अतिक्रमित जागेवरील घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, आश्वी पोलीस स्टेशनमध्ये मानवाधिकार राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या प्रकारानंतर संगमनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास, पक्षाच्या वतीने आश्वी पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा देण्यात आला आहे.2
- छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.1
- चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथील शिंदेवस्ती परिसरात आज सकाळी एका हृदयद्रावक दुर्घटनेत ५२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. दरेगाव येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई संतोष देवरे या आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात माहेरी आल्या होत्या. नात शिक्षणासाठी तिथेच त्यांच्या भावाकडे राहत असून, वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इंदुबाई कालच राजदेरवाडीला पोहोचल्या होत्या. आज सकाळी इंदुबाई नेहमीच्या नित्यक्रमासाठी आणि प्रातःविधीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा अनर्थ घडला. शिंदेवस्ती जवळील डोंगराचा भाग अचानक खचल्याने त्यावरून एक मोठा दगड थेट त्यांच्या अंगावर कोसळला. वजनी दगडाखाली दबल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कालपर्यंत आनंदाचे वातावरण असलेल्या घरात एका क्षणात शोककळा पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे दरेगाव आणि राजदेरवाडी दोन्ही गावांवर शोकवदना पसरली असून परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवड पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.2
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आज खेडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले. या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी दिंडोरी पेठचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडीला भेट दिली. यावेळी त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।1
- बनावट शालार्थ आदेश तयार करून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून प्रशांत तुळशीराम वाडीले नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर नाशिक येथे आणण्यात येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात उघड झाल्याप्रमाणे, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध मान्यता प्रस्ताव नसतानाही, मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण गैरव्यवहारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासादरम्यान समोर आले आहे की, प्रशांत वाडीले याने धुळे जिल्ह्यातील काही शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा वापर करून संबंधितांना वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात त्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस हवालदार कराड, गिते, पोलीस अंमलदार येवले तसेच अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस अंमलदार पचलोरे व महाले यांच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून वाडीले याला अटक केली. आरोपीला धुळे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, पोलीस हवालदार राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल यांचे पथक करत आहे.1
- नाशिकच्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड (वय ३७) यांना ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कारवाई थांबवून त्यांचे वाहन सोडण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार १० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.1
- येवला तालुक्यातील देवदरी येथील दाणे वस्ती परिसरात शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अज्ञात चोरट्याने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला आहे. कमल दामू दाणे असे या जखमी वृद्ध महिलेचे नाव असून, त्या घराच्या परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांना राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. तपासाला वेग देण्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.1