logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या लातूर पोलीस दलाच्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. १० जून २०२६ रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एलआयसी कॉलनी परिसरातील सुतमील झोपडपट्टी भागात छापा टाकला. या छाप्यात आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे (वय २६ वर्ष, रा. पळशी, ता. रेणापूर) याला एक गावठी पिस्टल आणि मॅगझीनसह ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या गावठी पिस्टलची किंमत ४५ हजार रुपये आहे. पुढील चौकशीदरम्यान, आरोपी आकाश ऊफाडे याने हे गावठी पिस्टल नानासाहेब अर्जुन ऊफाडे (रा. पळशी, ता. रेनापुर) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर, शस्त्र पुरवठादार नानासाहेब अर्जुन ऊफाडे याच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे आणि नानासाहेब अर्जुन ऊफाडे या दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाणे, लातूर येथे शस्त्र अधिनियम कलम ३(१)/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. लातूर पोलीस दलाने असेही स्पष्ट केले आहे की, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे किंवा त्यांचा वापर करणे ही गंभीर स्वरूपाची बाब असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध लातूर पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील.

on 11 June
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
on 11 June
c11131ab-7e90-4d99-aa70-f53ce1a22aa9

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या लातूर पोलीस दलाच्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. १० जून २०२६ रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एलआयसी कॉलनी परिसरातील सुतमील झोपडपट्टी भागात छापा टाकला. या छाप्यात आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे (वय २६ वर्ष, रा. पळशी, ता. रेणापूर) याला एक गावठी पिस्टल आणि मॅगझीनसह ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या गावठी पिस्टलची किंमत ४५ हजार रुपये आहे. पुढील चौकशीदरम्यान,

आरोपी आकाश ऊफाडे याने हे गावठी पिस्टल नानासाहेब अर्जुन ऊफाडे (रा. पळशी, ता. रेनापुर) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर, शस्त्र पुरवठादार नानासाहेब अर्जुन ऊफाडे याच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आकाश ऊर्फ मारी नवनाथ ऊफाडे आणि नानासाहेब अर्जुन ऊफाडे या दोघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाणे, लातूर येथे शस्त्र अधिनियम कलम ३(१)/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. लातूर पोलीस दलाने असेही स्पष्ट केले आहे की, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे किंवा त्यांचा वापर करणे ही गंभीर स्वरूपाची बाब असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध लातूर पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील.

More news from Maharashtra and nearby areas
  • अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    1
    अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी कारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तिरंगा ध्वज पदयात्रा काढण्यात आली.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    1
    नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची आता पुणे शहरामध्ये बदली झाली आहे. या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियानुसार, उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सत्तापक्षाच्या उमेदवारांनाच पसंती द्यावी.
    1
    मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या प्रतिक्रियानुसार, उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, विकासाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी सत्तापक्षाच्या उमेदवारांनाच पसंती द्यावी.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत दिली जात आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ब्रह्मकुमारी राजयोगिनी संतोषी दीदी यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यातील आठवणींचे क्षण आजही जपले जात आहेत. संतोषी दीदींच्या नांदेड दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.
    1
    ब्रह्मकुमारी राजयोगिनी संतोषी दीदी यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यातील आठवणींचे क्षण आजही जपले जात आहेत. संतोषी दीदींच्या नांदेड दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.
    user_SANDEEP
    SANDEEP
    TV News Anchor देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाकडून आसुड मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हा आहे.
    1
    शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाकडून आसुड मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हा आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अभय सावंत यांनी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी निश्चित केली आहे. या निवडणुकीत अभय सावंत हे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरणार आहेत.
    1
    आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अभय सावंत यांनी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी निश्चित केली आहे. या निवडणुकीत अभय सावंत हे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरणार आहेत.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 hrs ago
  • अक्कलकोट येथील आंबेडकरी समाज समूहाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अक्कलकोट तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे, आंबेडकरी समाज समूहाने आरक्षण उपवर्गीकरणाला आपला स्पष्ट विरोध दर्शवला.
    1
    अक्कलकोट येथील आंबेडकरी समाज समूहाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अक्कलकोट तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे, आंबेडकरी समाज समूहाने आरक्षण उपवर्गीकरणाला आपला स्पष्ट विरोध दर्शवला.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.