अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भक्ती-शक्ती चौक परिसरात वाहतूक बदल; अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भक्ती-शक्ती चौक परिसरात वाहतूक बदल; १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत निर्बंध साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२६ रोजी भक्ती-शक्ती शिल्पासमोर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार ही अधिसूचना जारी केली आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत (आवश्यकतेनुसार) संबंधित मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतील. *बंद राहणारा मार्ग- जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुणागेट हॉटेलसमोरील मर्ज-आऊट येथून भक्ती-शक्ती चौकाकडे (भक्ती शक्ती ब्रिज चढण्याचा मार्ग) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.* *पर्यायी मार्ग - वाहनचालकांनी सेंट्रल चौक - भक्ती-शक्ती ओव्हरब्रिज - रुद्रा पार्किंग मार्गे आपल्या इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. Pune- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..1