शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी: बीड जिल्ह्यात महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' बीड,प्रतिनीधी(लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज) : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि प्रशासकीय सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोहोचवण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या अभियानाची घोषणा करण्यात आली असून, प्रशासनाने अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या अभियानांतर्गत तालुका स्तरावर 'सेवा सेतू' शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, 'आपले सरकार सेवा केंद्रां'च्या माध्यमातून नागरिकांचे अर्ज व कागदपत्रांची पडताळणी जागीच पूर्ण केली जाईल. अभियानातील प्रमुख सेवा व योजना: महसूल व भूमी अभिलेख: प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे, वन हक्क दावे मंजुरी आणि खरेदी-विक्री व्यवहार मोजणीशी जोडणे. नागरी सुविधा: नवीन नळ जोडणी, मालमत्ता कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद आणि प्रलंबित घरगुती वीज जोडणी. दाखले व प्रमाणपत्रे: नॉन-क्रीमीलेअर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार सेवा आणि शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग लायसन्स). कृषी व कल्याणकारी योजना: मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (सिंचन विहीर नोंदणी), शिधापत्रिका वाटप आणि महिला बचत गट नोंदणी. याशिवाय 'सेवा माझे योगदान' मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान, विकसित भारत संकल्प यात्रा, अंगणवाडी उत्सव आणि लाभार्थ्यांच्या घरी 'आशीर्वादाचा दिवा' प्रज्वलित करणे यांसारखे उपक्रमही राबवले जाणार आहेत. प्रशासनाचे आवाहन: प्रशासकीय सेवा थेट दारापर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत लाभ देणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील नागरिकांनी शिबिरांना येताना आवश्यक ती मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सोबत आणून या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- परळी येथील बौद्ध विहारात विविध कार्यक्रमाचे आयोजन ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद1
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था बीड | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका घेणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील मराठा समाज बांधव सज्ज झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला भगिनींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज दादांच्या स्वागताची तयारी करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी समाजबांधवांची गर्दी होत आहे. मनोज दादांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी बीडकर एकवटले आहेत.2
- मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी मुंबई ते मराठवाड्याचे अंतर आणखी कमी होणार ; कल्याण ते लातूर अवघ्या चार तासात पोहोचणाऱ्या तब्बल 442 किलोमीटरच्या "जनकल्याण एक्सप्रेस वेला" राज्य शासनाची मंजुरी सोनपेठ (दर्शन) :- तब्बल 35000 कोटी रुपयांचा खर्च सहा पदरी ग्रीन फील एक्सप्रेस वे आणि माळशिरस घाटात तब्बल आठ किलोमीटरचा भव्य असा बोगदा मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे कल्याण परिसराला मराठवाड्याची जोडणाऱ्या कल्याण ते लातूर जनकल्याण एक्सप्रेस वेला राज्य सरकारची मंजुरी दिलेली आहे सध्या लातूर ते कल्याण प्रवासासाठी 12 तास वेळ लागतो तू वेळ हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर चार तासाचा होणार आहे.1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- मरणार पण शरण जाणार नाही! १८ दिवसांच्या उपोषणानंतर मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे रवाना | Manoj Jarange Patil तब्बल १८ दिवसांच्या कडक आमरण उपोषणानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. प्रकृती अत्यंत खालावली असतानाही "मी मरणार पण शरण जाणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. याबद्दलची सविस्तर बातमी पाहा या व्हिडिओमध्ये. मराठा आरक्षणाचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ताज्या घडामोडींचे अचूक आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या 'साथ महाराष्ट्राची न्यूज' या चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा!1