खासदार अमर काळे संसदीय आश्वासन समितीच्या केरळ-गोवा-महाराष्ट्र दौऱ्यावर वर्धा न्यूज़ खासदार अमर काळे हे संसदेच्या आश्वासन समितीवर असल्यामुळे संसद कार्यालयाद्वारे आयोजित दिनांक. 29.5.2026 ते 3.6.2026 रोज़ी पर्यंतच्या अभ्यास दौऱ्याकरीता केरळ राज्यातील कोची, गोवा, महाराष्ट्र राज्यातील मुंबई व गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कोची येथे जलशक्ती मंत्रालयाशी संबंधीत पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यावरण विभागाशी वने व वातावरणीय बदल तसेच राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे विभागाशी बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे यासोबतच केंद्रीय ऊर्जा विभाग, औष्णीक उर्जा विभाग, केरळ राज्य विद्युत मंडळ व यासोबतच अणु उर्जा संबंधीत NPCIL इत्यादी विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेणार आहे. दिनांक. 30.5.2026. रोज़ी ला इंडीयन ऑईल कार्पोरेशन तसेच केरळ राज्यातील हरित हायड्रोजन धोरणा संदर्भात तसेच केरळ राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बायपास बांधकामा संदर्भात सुध्दा चर्चा करणार आहे. दिनांक. 1.6.2026 . रोज़ी ला महाराष्ट्र राज्यातील केमिकल्स ॲन्ड फर्टीलायझर्स मंत्रालयातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी नदी विकास प्रकल्प यासोबतच जलसंधारण समुद्री मार्ग मंत्रालय, हवाई मार्ग विभागाचे अधिकारी, यांचे सोबत विविध विषयांवर बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. दिनांक. 2.6.2026 रोजी अभ्यास समिती सोबत खासदार अमर काळे हे गोवा राज्यात जाणार असून तेथे समुद्री जलमार्ग मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, इंडीयन नेव्ही व इंडीयन पोस्टकार्ड, पर्यावरण मंत्रालयाशी टुरिझम हबची निर्मिती यासह रोजगार, कामगार, राज्य विमा महामंडळा सोबत जी.आय.जी. वर्कर्सला सामाजिक सुरक्षा देणे इत्यादी विषयांवर या अभ्यास समिती अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या दौऱ्याची सांगता गोवा राज्यात दिनांक. 3.6.2026 रोज़ी ला होईल

- नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात आता आधुनिक माध्यम शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे. डॉ. धर्मेश धावणकर यांच्या विशेष मुलाखतीतून या संदर्भात नवीन अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती समोर आली आहे.1
- वर्धा जिल्ह्यात ‘आपदा मित्र व सखी’ या १२ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा समारोप यशस्वीरीत्या पार पडला आहे. DDMU शुभम घोरपडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले. या प्रशिक्षणात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, देवळी, वर्धा, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्यांमधून युवक-युवती, महिला, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, महसूल विभागातील तलाठी, आरोग्य खात्यातील डॉक्टर, अग्निशामक दलातील फायर फायटर, विद्यार्थी, पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. बारा दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणादरम्यान चहा, नाश्ता, जेवण आणि निवासाची उत्तम व्यवस्था शासकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणी करण्यात आली होती. प्रशिक्षण काळात आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती काळात लोकांचे सुरक्षित बचाव कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पूर आणि इमारत कोसळणे यांसारख्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले गेले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या किंवा अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बोटिंग करून, टीम एल-शेप आणि व्ही-शेप तयार करून, तसेच थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना तयार करण्यात आले. विविध प्रकारच्या दोरीचे प्रकार आणि गाठी कशा कराव्यात यावरही सखोल तासिका घेण्यात आल्या. याव्यतिरिक्त, विषारी, बिनविषारी व निमविषारी सापांचे प्रकार आणि त्यावरच्या उपाययोजनांची सखोल माहिती प्रोजेक्टरवर डिजिटल माध्यमाद्वारे देण्यात आली. सीपीआर कसे करावे आणि प्राण कसे वाचवावे, यावर प्रथमोपचार करून कृतीद्वारे प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी, २८ मे २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य प्रशिक्षक श्री. ओम सपार, बजरंग होटकर, शकुंतला राय आणि मैथिली जाधव उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने आपदा मित्र व सखी प्रशिक्षणार्थी तसेच वर्धा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे सदस्य हजर होते. काही आपदा मित्र व सखी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्व प्रशिक्षणार्थींना शपथ देऊन प्रार्थना करण्यात आली. हे बारा दिवसांचे निवासी प्रशिक्षण उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले.4
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या रामनगर तांडा येथे शेतातील विहिरीत पोहताना बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाप आणि लेक शेतातील विहिरीत बराच वेळ पोहत असताना अचानक ते पाण्याखाली गेले. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना विहिरीतून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे रामनगर तांडा येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.1
- Post by Gopal. salame4
- आयडियल ॲकडमीच्या प्रशिक्षकाची मेहनत फळाला आली असून, २०२६ च्या पोलीस भरती प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ॲकडमीच्या आठ जणांची निवड झाली आहे. या निवड झालेल्यांमध्ये अविनाश धरत (रा. भिवापूर) यांची नागपूर शहर पोलीस दलात, मयुर थाटकर (ता. कुही) यांची नागपूर ग्रामीण पोलीस दलात आणि कोम बाळबुधे (रा. कोटलपार, ता. पवनी) यांची निवड झाली आहे. याशिवाय, पायल गिरी (रा. भिवापूर), सलोनी हर्षे (रा. भिवापूर) आणि साक्षी राघोते (रा. जवराबोडी) यांचीही नागपूर शहर पोलीस दलात निवड झाली आहे. निलेश निमजे (रा. भिवापूर) यांची इंडियन आर्मीमध्ये, तर सुशांत भागवतकर (रा. भिवापूर) यांची महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्समध्ये निवड झाली आहे. या सर्व निवड झालेल्या जवानांचा आयडियल ॲकडमीचे संचालक तथा प्रशिक्षक गोलु भोगे यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन उत्साहात सत्कार केला. पोलीस भरतीमध्ये भिवापूरच्या युवकांनी घेतलेली ही उंच भरारी कौतुकास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.1
- गुन्हे शाखेने अवैध दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात २ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.1
- रामटेक-तुमसर मार्गावर चालत्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या घटनेमुळे कास्तकारीचे मोठे नुकसान झाले आहे.1