logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औसा येथे नकली सोन्याची विक्री, फसवणूक करण्याचा प्रयत्न उधळला; औसा पोलिसांची तत्परतेने कारवाई, तिघे जेरबंद. औसा येथे नकली सोन्याची विक्री, फसवणूक करण्याचा प्रयत्न उधळला; औसा पोलिसांची तत्परतेने कारवाई, तिघे जेरबंद. सूरु ऍप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार 21एप्रील 2026. औसा (प्रतिनिधी):- शहरात नकली सोने विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला असून या प्रकरणात तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता औसा येथील जुने बस स्थानक परिसरात घडली. अमर बसवराज रडडे वय 26 वर्षे रा. केवळराम गल्ली औसा हे कुमारस्वामी महाविद्यालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते विजय जनरल स्टोअर्सकडे जात असताना त्यांच्या जवळ तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी स्वतःकडे सोन्याचे बिस्कीट व अंगठी असल्याचे सांगून कमी दरात विक्री करण्याची ऑफर दिली. संशयितांपैकी एका व्यक्तीने गुलाबी कागदात गुंडाळलेले दोन पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्कीट आणि एक अंगठी दाखवली. त्यांनी एक बिस्कीट पाच तोळे असून त्याची किंमत 2 लाख 50 हजार रुपये तर एक तोळ्याची अंगठी 50 हजार रुपयांना देण्याची तयारी दर्शवली. मात्र पावती देण्यास नकार दिल्यामुळे अमर रडडे यांना संशय आला. यावेळी त्यांनी तत्काळ औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाउसाहेब माळवदकर यांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपींना बोलण्यात गुंतवून ठेवण्याचे सांगितले. काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान आरोपींची नावे केरवा सुर्यभान जाधव वय 70 वर्षे रा. सलगरा बु. जि. लातूर, केशव छगन जाधव वय 50 वर्षे रा. दहिटणे जि. जालना सध्या शिवनी बु. ता. औसा आणि गोवर्धन गणपत गोरे वय 40 वर्षे रा. नूर कॉलनी जि. बीड अशी समोर आली. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत दोन पिवळ्या रंगाचे धातूचे बिस्कीट व एक अंगठी जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी सदर वस्तू नकली असल्याची कबुली देत नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने आणल्याचे सांगितले. या घटनेमुळे कमी दरात सोने देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. अमर रडडे यांच्या जागरूकतेमुळे मोठी फसवणूक टळली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना दिल्यास गुन्हे रोखण्यास मोठी मदत होते, असा संदेश या घटनेतून समोर आला आहे.

2 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
4549a3f9-18bc-4aea-afef-3eb5b95583fa

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    1
    लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    1
    17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर 
संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. 
वाहन चालकासह कार जळून खाक.
सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून  घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला.
👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,  ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. ‎ ‎           लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. ‎पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर)  यास ताब्यात घेण्यात आले. ‎त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या  एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. ‎या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण  ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. ‎सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील  पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    4
    अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,  ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त.
‎
‎          
लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे.
‎पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर)  यास ताब्यात घेण्यात आले.
‎त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या  एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली.
‎या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण  ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
‎सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील  पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Karan
    1
    Post by Karan
    user_Karan
    Karan
    Photographer कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल
    1
    वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    1
    📍खळबळ जनक घटना 
लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.