जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार अनंत चिलगर यांना प्रदान परभणी (प्रतिनिधी) – ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार (वर्ष २०२३–२०२४) बलसा खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अनंत मनोहर चिलगर यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. अनंत चिलगर यांनी ग्रामपंचायत बलसा खुर्द येथे विविध शासकीय कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उद्दिष्टपूर्ती करत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शौचालयांची १०० टक्के पूर्तता करून गाव स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श ठरवले आहे. याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टही शंभर टक्के पूर्ण करण्यात आले असून, संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व उपक्रमांमुळे बलसा खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यात आदर्श म्हणून ओळखली जात आहे. हा पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकळे, उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश माथुर, अतिरिक्त सीईओ रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अंकुश चव्हाण तसेच पंचायत अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजय निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या मानाच्या पुरस्काराबद्दल अनंत मनोहर चिलगर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- Post by Mohammad Rafikh1
- Post by वैजनाथ पावडे1