उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण खामगाव : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन खामगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सकाळी ८ वाजता शासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समारंभास उपविभागीय कृषी अधिकारी बी. जी. व्यवहारे तहसिलदार सुनिल पाटील,तालुका कृषी अधिकारी सुनिल पवार,नायब तहसिलदार अभिजीत जोशी, नायब तहसिलदार शिरीष वसावे, नायब तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार निखिल पाटील, नायब तहसिलदार सोनाली भाजीभाकरे, निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझेले, अनिल खिराडे माजी सैनिक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, समारंभ राष्ट्रगीताने संपन्न झाला.
उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण खामगाव : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा वर्धापन दिन खामगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज सकाळी ८ वाजता शासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. समारंभास उपविभागीय कृषी अधिकारी बी. जी. व्यवहारे तहसिलदार सुनिल पाटील,तालुका कृषी अधिकारी सुनिल पवार,नायब तहसिलदार अभिजीत जोशी, नायब तहसिलदार शिरीष वसावे, नायब तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार निखिल पाटील, नायब तहसिलदार सोनाली भाजीभाकरे, निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझेले, अनिल खिराडे माजी सैनिक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून, समारंभ राष्ट्रगीताने संपन्न झाला.
- Post by विदर्भ शासन न्यूज..1
- Post by Sharad Dayedar1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.1
- महाराष्ट्रः नवापुर में बर्ड फ्लू का गहराया संकट, मारी जाएंगी 1.40 लाख मुर्गियां, 5 km तक बनाया बफर जोन पशुपालन विभाग की ओर से यह अपील की गई है कि बर्ड फ्लू के संक्रमण को देखते हुए लोग अंडे और चिकन के सेवन को लेकर सरकारी दिशा-निर्देशों का पालन करें. बर्ड फ्लू के खतरे के बीच अन्य जिलों को भी अलर्ट कर दिया गया है. देश में बर्ड फ्लू के संक्रमण के मामले बढ़ने लगे हैं. महाराष्ट्र में बर्ड फ्लू से खासी तबाही मची है. नंदुरबार के नवापुर के एक पोल्ट्री फार्म में बर्ड फ्लू के संक्रमण की पुष्टि होने के बाद करीब 1 लाख 40 हजार मुर्गियों को मारने का आदेश जारी किया गया है. साथ ही प्रभावित क्षेत्र के एक किलोमीटर के दायरे में आने वाली मुर्गियों को भी मारा जाएगा. संक्रमित मुर्गियों को मारने का काम आज शुक्रवार से शुरू किया जाएगा. नवापुर तालुका के 3 पोल्ट्री फार्म के सैंपल इंदौर की प्रयोगशाला में भेजे गए थे, जिनकी रिपोर्ट पॉजिटिव आई है. नाजुक स्थिति को देखते हुए तालुका स्तर की एक समिति का गठन किया गया है और अब नवापुर क्षेत्र के सभी पोल्ट्री फार्म के सैंपल लिए जाने के आदेश दिए गए हैं. इससे पहले मामला तब सामने आया जब 12 और 13 अप्रैल को यहां के कुछ पोल्ट्री फार्म में मुर्गियों के संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई थी.1
- Post by Amravati News Update1
- जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.1