विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन नंदुरबार : शासनातर्फे बारा बलुतेदार पद्धतीनुसार पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्य शाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आशा सिंघवी म्हणाल्या कि, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून विश्वकर्मा कौशल्य विकास योजना महत्वपूर्ण असून लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संघवी यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी सांगितले की, व्यवसाय करताना कर्ज पुरवठा व्यवसाय यशस्वीतेसाठी ग्राहकांना दर्जेदार आणि योग्य किमतीत वस्तू देणे महत्त्वाचे ठरते. बारा बलुतेदारांचे व्यवसाय पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. विविध योजना अंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या समावेश असून आर्थिक सहाय्यासाठी बँका सदैव तत्पर असल्याचे पैठणकर यांनी सांगितले. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना एमएसएमई मंत्रालयाचे डेप्युटी डायरेक्टर प्रफुल्ल उमरे यांच्या समन्वयाने कार्यशाळा झाली. याप्रसंगी उमरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. उत्पादित माल आणि बाजार पेठेतील मागणीनुसार पुरवठा, डिजिटल मार्केटिंग, क्यूआर कोड स्कॅन करणे आणि पॅकेजिंग बाबत मार्गदर्शन केले. मुंबई येथील विश्वकर्मा योजनेचे प्रतिनिधी हिमांशू सराटे यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. एक दिवसीय कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजना, प्रकल्प, डिजिटल मार्केटिंग, या कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना तसेच नंदुरबार जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते साठी राजेश गवांदे, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, मधुक्षेत्रीक दक्षता चव्हाण, वसंत गावित यांनी परिश्रम घेतले.
विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन नंदुरबार : शासनातर्फे बारा बलुतेदार पद्धतीनुसार पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्य शाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आशा सिंघवी म्हणाल्या कि, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून विश्वकर्मा
कौशल्य विकास योजना महत्वपूर्ण असून लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संघवी यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी सांगितले की, व्यवसाय करताना कर्ज पुरवठा व्यवसाय यशस्वीतेसाठी ग्राहकांना दर्जेदार आणि योग्य किमतीत वस्तू देणे महत्त्वाचे ठरते. बारा बलुतेदारांचे व्यवसाय पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. विविध योजना अंतर्गत पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या समावेश असून आर्थिक सहाय्यासाठी बँका सदैव तत्पर असल्याचे पैठणकर यांनी
सांगितले. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना एमएसएमई मंत्रालयाचे डेप्युटी डायरेक्टर प्रफुल्ल उमरे यांच्या समन्वयाने कार्यशाळा झाली. याप्रसंगी उमरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. उत्पादित माल आणि बाजार पेठेतील मागणीनुसार पुरवठा, डिजिटल मार्केटिंग, क्यूआर कोड स्कॅन करणे आणि पॅकेजिंग बाबत मार्गदर्शन केले. मुंबई येथील विश्वकर्मा योजनेचे प्रतिनिधी हिमांशू सराटे यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सखोल
मार्गदर्शन केले. एक दिवसीय कार्यशाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजना, प्रकल्प, डिजिटल मार्केटिंग, या कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना तसेच नंदुरबार जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीते साठी राजेश गवांदे, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, मधुक्षेत्रीक दक्षता चव्हाण, वसंत गावित यांनी परिश्रम घेतले.
- लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.1
- चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे4
- संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।1
- दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .1
- तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद... सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले... तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली. तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण 244.25 mm पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवस भर जोरदार पावसाने झोडपले आहे.1
- सातपुड्यात चांदसैली घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात कोसळला दगडांचा खच.... सातपुड्याच्या दुर्गम भाग असल्यास धडगाव तालुक्याशी नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा घाट रस्ता बंद.... घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... भला मोठा दगडांचा खच वळण मार्गावरच कोसळल्याने दोडीकडील वाहतूक बंद झाल्याने प्रवासी रस्त्यातच अडकले.....1