हाकेच्या अंतरावर जुगार, लाडखेड पोलिसांचे मौन, पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलिस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा बोलबाला सुरू असून, स्थानिक पोलिस प्रशासनाकडून याकडे होत असलेले अर्थपूर्ण दुर्लक्ष हे एक गंभीर प्रश्न बनला आहे. हाकेच्या अंतरावर जुगार अड्डे सुरू असताना ठाणेदारांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. बोरी, ब्रम्ही रस्ता, महागाव कसबा या भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळवला जात असून, कोंबड बाजारात आठवड्यातून दोनदा लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे गावागावात गावठी व विदेशी दारूच्या अड्ड्यांचा सुळसुळाट असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत आहे. लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत असून , दैनंदिन भांडणे, मारहाण आणि इतर गुन्हे वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिक, विशेषतः शेतकरी आणि मजूर वर्ग, या परिस्थितीमुळे मेटाकुटीला आला आहे. घरातील कमाई जुगारात उडवली जाते, कुटुंबीयांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि अनेकदा हिंसक घटना घडतात. यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. सध्या लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा 'नंगा नाच' सुरू असल्याचे आरोप होत आहेत. हे आरोप खरे असतील तर हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नव्हे, तर कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडूनच कायद्याचे उल्लंघन होत आहे. दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अवैध धंद्यांबाबत माहिती नसावी, यात शंका आहे . लाखो रुपयांची 'वर कमाई' होत असल्याने, कारवाईच होत नसल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे. एवढेच काय तर वरिष्ठांनाही येथील अवैध धंद्यातून हप्त्याची खेप पोहचविल्या जात असल्याचे परिसरात चर्चा आहे. जुगार आणि दारू यांसारख्या धंद्यांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. जुगारामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात, तर अवैध दारूमुळे आरोग्य आणि सामाजिक समस्या वाढतात. अवैध दारू आणि जुगाराविरुद्ध मागील काळात कारवाया झाल्या आहेत , परंतु लाडखेडसारख्या ठिकाणी सातत्याने दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे. लाडखेड ठाणेदारांना समज देऊन किंवा आवश्यक ती कारवाई करून अवैध धंदे बंद करावेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्याची होत असलेली 'राख रांगोळी' थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, अन्यथा जनतेचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल यात शंका नाही.

- Post by स्मिता तलेय1
- धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....1
- Post by Amravati News Update1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- Post by Amravati News Update1