मराठी अभिनेता भरत जाधव यांचा अन्नछत्र मंडळकडून सत्कार कार्यक्रम संपन्न राज्यातील धार्मिक क्षेत्रात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आगळा-वेगळा ठसा उमटविले असून, स्वामी भक्त हा केंद्रस्थानी मानून, एकाच छता खाली विविध भक्ताभिमुख सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसर हा पर्यावरण पूरक असल्याचे मनोगत प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना भरत जाधव हे बोलत होते. या वेळी न्यासाचे विश्वस्त व महाराष्ट्र पालखी पादुका परिक्रमा मुख्य संयोजक- संतोष भोसले, जयंतराव सुभेदार, शिरीष कुलकर्णी पुणे, अश्पाकभाई काझी, महांतेश स्वामी, संतोष माने, असद फुलारी आदिजन उपस्थित होते.
मराठी अभिनेता भरत जाधव यांचा अन्नछत्र मंडळकडून सत्कार कार्यक्रम संपन्न राज्यातील धार्मिक क्षेत्रात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आगळा-वेगळा ठसा उमटविले असून, स्वामी भक्त हा केंद्रस्थानी मानून, एकाच छता खाली विविध भक्ताभिमुख सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसर हा पर्यावरण पूरक असल्याचे मनोगत प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पुणे येथे प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सत्काराला उत्तर देताना भरत जाधव हे बोलत होते. या वेळी न्यासाचे विश्वस्त व महाराष्ट्र पालखी पादुका परिक्रमा मुख्य संयोजक- संतोष भोसले, जयंतराव सुभेदार, शिरीष कुलकर्णी पुणे, अश्पाकभाई काझी, महांतेश स्वामी, संतोष माने, असद फुलारी आदिजन उपस्थित होते.
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतीथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तीभावाने सुरूवात करण्यात आली. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व समिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदीसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, राजाभाऊ सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, मल्लिनाथ बोधले, प्रा.शिवशरण अचलेर, राजू भोसले सर, रमेश शिंदे सर, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.1
- नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारला पदभार. शूरू ॲप तर्फे मराठी न्यूज. लातूर, शनि. दि. ०४ एप्रिल 2026. लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४ एप्रिल 2026) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.3
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- निलंग्यात छावा संघटना आक्रमक; जिओ कंपनीचा मनमानी कारभार आणि नाटक खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा देत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास (भैया) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आज जिओ कार्यालयाला टाळे ठोकून कामकाज बंद पाडण्यात आले. नमस्कार छावा महाराष्ट्राचा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे निलंगा येथील जिओ ऑफिस ची नेमकी घटना काय? गेल्या काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील जिओ ग्राहकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनीच्या प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा असंतोष होता. या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेने आज थेट कृती करत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. 'नाटकं चालणार नाहीत' - दास साळुंके या आंदोलनावेळी बोलताना दास साळुंके म्हणाले की, कंपनी केवळ आश्वासनांचे गाजर दाखवत असून प्रत्यक्ष सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. "निलंग्याच्या मातीत ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासकीय नाटकं अजिबात सहन केली जाणार नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले.1
- लातूर, दि. ०४ (जिमाका): जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि.०४) मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.1
- Post by लहुकुमार शिंदे1
- Post by Vijay Meher1
- *जागतिक ऑटिझम दिनानिमित्त लातूर जिल्हा परिषदेत जनजागृती* लातूर, दि. ०२ (जिमाका): जागतिक ऑटिझम दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने गुरुवारी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वमग्नता (ऑटिझम) या विषयावर समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना शांती व स्वीकृतीचे प्रतीक असलेली 'निळी रिबीन' बांधून या दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच ऑटिझम या आजाराबद्दलची सविस्तर माहिती देणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या जनजागृती मोहिमेत ऑटिझम म्हणजे काय, त्याची मुख्य लक्षणे, सामाजिक व संवादातील अडचणी, पुनरावृत्ती वर्तन, आजाराची कारणे, लवकर ओळख, अचूक निदान आणि उपचार व व्यवस्थापन या विविध तांत्रिक आणि सामाजिक पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. यंदाच्या जागतिक ऑटिझम दिनाची मुख्य थीम “ऑटिझम आणि मानवता - प्रत्येक जीवनाला मूल्य आहे” अशी आहे. ही संकल्पना स्वमग्न व्यक्तींचा सन्मान, त्यांचे हक्क, सामाजिक समावेश आणि त्यांना मिळणाऱ्या समान संधींच्या महत्त्वावर भर देते. त्यांच्यातील अद्वितीय क्षमतांना वाव देणे आणि त्यांना समाजाचा अविभाज्य घटक मानणे, हा या थीमचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवता, मूल्य, सर्वसमावेशकता आणि जागरूकता या चतुःसूत्रीवर आधारित हे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैके यांच्यासह समाजकार्य विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. ****1