logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

परीक्षा सुरु होण्या अगोदर परीक्षा केंद्रावर महिला विद्यार्थिनीला बाथरूमसाठी नकार; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह बीड प्रतिनिधी बार्शी नाका परिसरातील Yashwantrao Chavan Institute College Beed येथे Bombay High Court संबंधित परीक्षेसाठी आलेल्या एका महिला विद्यार्थिनीला परीक्षा सुरू होण्यापूर्वी बाथरूम वापरण्यास नकार देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रावर बाथरूमची चौकशी केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या वॉचमनने “या ठिकाणी बाथरूम नाही, पलीकडील लॉ कॉलेजमध्ये जा” असे सांगत तिला त्या ठिकाणीच सुविधा देण्यास नकार दिला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अशा मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित संस्थेची जबाबदारी असते. मात्र या घटनेमुळे केंद्राच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनी किंवा पालकांकडून अधिकृत तक्रार दाखल झाल्यास प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधांची खात्री करणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.

6 hrs ago
user_परळी वार्ता
परळी वार्ता
Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
6 hrs ago
67d668f6-bcc8-42b2-b3c8-033a36ce792d

परीक्षा सुरु होण्या अगोदर परीक्षा केंद्रावर महिला विद्यार्थिनीला बाथरूमसाठी नकार; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह बीड प्रतिनिधी बार्शी नाका परिसरातील Yashwantrao Chavan Institute College Beed येथे Bombay High Court संबंधित परीक्षेसाठी आलेल्या एका महिला विद्यार्थिनीला परीक्षा सुरू होण्यापूर्वी बाथरूम वापरण्यास नकार देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रावर बाथरूमची चौकशी केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या वॉचमनने “या ठिकाणी बाथरूम नाही, पलीकडील लॉ कॉलेजमध्ये जा” असे सांगत तिला त्या ठिकाणीच सुविधा देण्यास नकार दिला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अशा मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित संस्थेची जबाबदारी असते. मात्र या घटनेमुळे केंद्राच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनी किंवा पालकांकडून अधिकृत तक्रार दाखल झाल्यास प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधांची खात्री करणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • खासदार संजय जाधव , माजी आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते Hotel ORBIT चे उदघाटन
    1
    खासदार संजय जाधव , माजी आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते Hotel ORBIT चे उदघाटन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    10 hrs ago
  • #रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩 ​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'! ​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा: ​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।। सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।। दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।। दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।" ​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो? ​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇 ​
    1
    #रामदास_इतिहास आणि #वास्तव! #वाचा_शेयर_करा 🚩
​अनेक वर्षे आपल्याला खोटा इतिहास सांगून दिशाभूल केली गेली. पण ऐतिहासिक पुरावे आणि मूळ दस्तऐवज काय सांगतात हे आपण वाचायला हवे. सोबत जोडलेला फोटो भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (Vol. 61, No. 1, July 1982) च्या त्रैमासिकातील आहे. ही आहे 'रामदासाची आदिलशहास अर्जी'!
​यात रामदासाने स्वतःच्या हस्ताक्षरात आदिलशहाला काय विनंती केली आहे, त्या ओळी बघा:
​"पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।।
सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।।
दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।।
दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।।"
​यावरून हे स्पष्ट होते की, हा रामदास ठोसर याचा शिवरायांशी संबंध नाहीच, उलट तो आदिलशाहीवर इमान कायम ठेवणारा होता! ज्या माणसाला आदिलशाही दरबार हीच आपली 'काशी' (पवित्र स्थान) वाटते आणि जो 'शिवाजी महाराजांच्या राज्याची धुळधान व्हावी' अशी मागणी आदिलशहाकडे करतो, तो स्वराज्याचा हितचिंतक कसा असू शकतो?
​खरा इतिहास वाचा, सत्य समजून घ्या आणि खोटा प्रचार थांबवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट शेअर करा. 👇
​
    user_Arun Vasantrao Nagalgave
    Arun Vasantrao Nagalgave
    Farmer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लातूर-उदगीर तालुक्यातील वाढवणा शिवारात दोन हरीण पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्या,आशिष कल्लूरे यांनी हरणाचे वाचवले प्राण
    1
    लातूर-उदगीर तालुक्यातील वाढवणा शिवारात दोन हरीण पाण्याच्या शोधात विहिरीत पडल्या,आशिष कल्लूरे यांनी हरणाचे वाचवले प्राण
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पैठणचा कालवा फुटला..! खडका-मडका परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता खंडित.. पैठण येथून माजलगावकडे जाणारा उजवा कालवा आज ३६ एप्रिल रोजी रात्री फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडका-मडका परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होणार असून खालच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसे प्रशासनास शेतकऱ्यांनी कळवले आसल्याची माहिती असून दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे असे समजते.
    1
    पैठणचा कालवा फुटला..! खडका-मडका परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता खंडित..
पैठण येथून माजलगावकडे जाणारा उजवा कालवा आज ३६ एप्रिल रोजी रात्री फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडका-मडका परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होणार असून खालच्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. तसे प्रशासनास शेतकऱ्यांनी कळवले आसल्याची माहिती असून दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे असे समजते.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • *एमआयडीसीच्या २२० केव्ही मधून मोतीबाग ३३ केव्ही कडे जाणारी वीज खंडित, २४ तास जालना शहर ठप्प; वीज यंत्रणेतील हलगर्जीपणावर आमदार बबनराव लोणीकरांचा संताप* *वीज वितरण अधिकारी, कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे जालना त्रस्त; शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत - आमदार बबनराव लोणीकर* *३०० कोटी रुपये निधी मंजूर असताना केंद्र-राज्य लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंमलबजावणीत अडखळतोय - आमदार बबनराव लोणीकर* *आठवडाभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे काम सुरू करू, लोणीकरांच्या संतापानंतर अधिकाऱ्यांची माहिती* प्रतिनिधी - जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधून २२० केव्ही लाईनद्वारे मोतीबागसह शहरातील विविध ३३ केव्ही फीडरला वीज पुरवठा केला जातो. मात्र २३ तारखेपासून तारा तुटल्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली असून शनी मंदिर, माऊली नगर, यशवंत नगर, समर्थ नगर तसेच शासकीय कार्यालय परिसर आणि लगतच्या भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या परिस्थितीमुळे लाखो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. व्यापारी, रुग्णालये व लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी कंत्राटदार आणि वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यासाठी वीज वितरण विभागाकडून ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मोतीबाग परिसरात ३० केवी अंतर्गत नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मर उभारणीचे टेंडर व वर्क ऑर्डरही पूर्ण झालेले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदारांनी कामात ढिलाई केल्यामुळे ही कामे रखडली आहेत. कामांची गुणवत्ता आणि गती या दोन्ही बाबतीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या संतापानंतर येत्या आठवड्याभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे कामकाज सुरू करू अशा अधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. लोणीकर यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांद्वारे वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रधानमंत्री सहज वीज हर घर योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, पुनर्रचित वीज वितरण क्षेत्र योजना तसेच स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम या माध्यमातून वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना, राष्ट्रीय सौर मिशन आणि प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वस्त व शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत कमतरता राहिल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. राज्य शासनाच्या योजनांबाबत माहिती देताना लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कृषी पंप वीज जोडणी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच घरगुती वीज जोडणी सुलभ योजना या माध्यमातून थेट लाभ दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री सौर रूफटॉप योजना, सौर पाणी तापक अनुदान योजना आणि लघुउद्योग वीज सवलत योजना यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिक व उद्योगांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ई-वाहन खरेदी व चार्जिंग सुविधा प्रोत्साहन देखील दिले जात आहे. या सर्व योजना लोककल्याणासाठी राबविल्या जात असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या योजनांचा वेग वाढवणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले. वीज पायाभूत सुविधांच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना, राष्ट्रीय वीज प्रसारण योजना आणि राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांद्वारे १३२ केवी, २२० केवी व ४०० केवी स्तरावरील जाळे मजबूत केले जात आहे. राज्य स्तरावर महावितरण पायाभूत सुविधा विकास योजना, फीडर सेपरेशन योजना आणि महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनीच्या प्रकल्पांद्वारे उपकेंद्रे व लाईन विस्ताराचे काम सुरू आहे. या सर्व योजनांचा उद्देश वीज पुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह करणे हा आहे. पायाभूत सुविधा सक्षम झाल्यास भविष्यात अशा अडचणी टाळता येतील. त्यामुळे या कामांना तातडीने गती देणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. दरम्यान, लोणीकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, कंत्राटदारांनी तात्काळ काम सुरू करून पूर्ण करावे अन्यथा वीज वितरण विभागाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. “तंत्रज्ञान उपलब्ध असूनही काम वेळेत होत नाही, ही गंभीर बाब आहे. योग्य वेळी कारवाई केल्यास कामे जलद गतीने पूर्ण होतील,” असे ते म्हणाले. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
    1
    *एमआयडीसीच्या २२० केव्ही मधून मोतीबाग ३३ केव्ही कडे जाणारी वीज खंडित, २४ तास जालना शहर ठप्प; वीज यंत्रणेतील हलगर्जीपणावर आमदार बबनराव लोणीकरांचा संताप*
*वीज वितरण अधिकारी, कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे जालना त्रस्त; शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत - आमदार बबनराव लोणीकर*
*३०० कोटी रुपये निधी मंजूर असताना केंद्र-राज्य लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंमलबजावणीत अडखळतोय - आमदार बबनराव लोणीकर*
*आठवडाभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे काम सुरू करू, लोणीकरांच्या संतापानंतर अधिकाऱ्यांची माहिती*
प्रतिनिधी -
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधून २२० केव्ही लाईनद्वारे मोतीबागसह शहरातील विविध ३३ केव्ही फीडरला वीज पुरवठा केला जातो. मात्र २३ तारखेपासून तारा तुटल्यामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली असून शनी मंदिर, माऊली नगर, यशवंत नगर, समर्थ नगर तसेच शासकीय कार्यालय परिसर आणि लगतच्या भागात मागील २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. या परिस्थितीमुळे लाखो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. व्यापारी, रुग्णालये व लघुउद्योगांनाही याचा मोठा फटका बसला आहे. संपूर्ण शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी कंत्राटदार आणि वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यासाठी वीज वितरण विभागाकडून ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मोतीबाग परिसरात ३० केवी अंतर्गत नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मर उभारणीचे टेंडर व वर्क ऑर्डरही पूर्ण झालेले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदारांनी कामात ढिलाई केल्यामुळे ही कामे रखडली आहेत. कामांची गुणवत्ता आणि गती या दोन्ही बाबतीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. आमदार बबनराव लोणीकर यांच्या संतापानंतर येत्या आठवड्याभरात मोतीबाग ३३ केव्ही येथील १० एमव्हीए ट्रांसफार्मर बसवण्याचे कामकाज सुरू करू अशा अधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
लोणीकर यांनी पुढे सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांद्वारे वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रधानमंत्री सहज वीज हर घर योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, पुनर्रचित वीज वितरण क्षेत्र योजना तसेच स्मार्ट मीटर राष्ट्रीय कार्यक्रम या माध्यमातून वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना, राष्ट्रीय सौर मिशन आणि प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वस्त व शाश्वत ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मात्र स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीत कमतरता राहिल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या योजनांबाबत माहिती देताना लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कृषी पंप वीज जोडणी योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच घरगुती वीज जोडणी सुलभ योजना या माध्यमातून थेट लाभ दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री सौर रूफटॉप योजना, सौर पाणी तापक अनुदान योजना आणि लघुउद्योग वीज सवलत योजना यांसारख्या उपक्रमांमुळे नागरिक व उद्योगांना दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ई-वाहन खरेदी व चार्जिंग सुविधा प्रोत्साहन देखील दिले जात आहे. या सर्व योजना लोककल्याणासाठी राबविल्या जात असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या योजनांचा वेग वाढवणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
वीज पायाभूत सुविधांच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजना, राष्ट्रीय वीज प्रसारण योजना आणि राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांद्वारे १३२ केवी, २२० केवी व ४०० केवी स्तरावरील जाळे मजबूत केले जात आहे. राज्य स्तरावर महावितरण पायाभूत सुविधा विकास योजना, फीडर सेपरेशन योजना आणि महाराष्ट्र राज्य वीज प्रसारण कंपनीच्या प्रकल्पांद्वारे उपकेंद्रे व लाईन विस्ताराचे काम सुरू आहे. या सर्व योजनांचा उद्देश वीज पुरवठा अधिक स्थिर व विश्वासार्ह करणे हा आहे. पायाभूत सुविधा सक्षम झाल्यास भविष्यात अशा अडचणी टाळता येतील. त्यामुळे या कामांना तातडीने गती देणे आवश्यक आहे असे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
दरम्यान, लोणीकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, कंत्राटदारांनी तात्काळ काम सुरू करून पूर्ण करावे अन्यथा वीज वितरण विभागाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. “तंत्रज्ञान उपलब्ध असूनही काम वेळेत होत नाही, ही गंभीर बाब आहे. योग्य वेळी कारवाई केल्यास कामे जलद गतीने पूर्ण होतील,” असे ते म्हणाले. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    2
    जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड
शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.* महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख आमर श्रीमंत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली. यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी अमर श्रीमंत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.
    2
    *अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.*
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे.
दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे.
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख आमर श्रीमंत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली.
यानंतर  कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपी अमर श्रीमंत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    14 hrs ago
  • पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    1
    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • जिथे दादागिरी केली तिथेच धिंड काढत मस्ती जिरवली, अट्टल गुन्हेगारांची दादागिरी संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
    1
    जिथे दादागिरी केली तिथेच धिंड काढत मस्ती जिरवली, अट्टल गुन्हेगारांची दादागिरी संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.