पिंपरी, २९ मे २०२६ रोजी फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट देऊन दाखल रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांवर आवश्यक असलेले सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती दिली आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या भेटीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार आणि वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी उपचार व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच, रुग्णालय प्रशासनाने सतर्क राहून या प्रकरणातील रुग्णांना तात्काळ दाखल करून घेऊन आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या वतीने उत्तम वैद्यकीय उपचार दिले जात असल्याची माहिती दिली. महापालिकेचे वैद्यकीय पथक सातत्याने रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून, लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी नातेवाईकांना काळजी न करण्याचे आवाहन करत महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “विषारी दारू प्रकरणातील दाखल सर्व रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनीही माहिती दिली की, “वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. या प्रकरणातील दाखल रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, सध्या तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालय प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. बाधित रुग्णांनी वेळेत वैद्यकीय उपचार करून घेणे अत्यंत आवश्यक असून, या बाधितांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.”

- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.1
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.1
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.1
- घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.1
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- भोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत आमदार शंकर मांडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. महाड-पंढरपूर महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी नागरिकांनी तक्रारी केल्याने आमदार मांडेकर चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आणि त्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. या बैठकीला पंचायत समिती सभापती कंक, उपसभापती विशाल कोंडे आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे हे उपस्थित होते.1
- विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.1