logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजनेला वेग* *अतिक्रमणमुक्त, बारमाही रस्त्यांसाठी शासनाची कडक भूमिका; नुकसान केल्यास फौजदारी कारवाई* नांदेड दि.१८ फेब्रुवारी:-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मजबूत, दर्जेदार व बारमाही शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंधार येथे विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार येथे संबंधित अधिकारी व यंत्रणांची बैठक घेऊन कामकाजाला गती देण्याच्या सूचना दिल्या. या योजनेअंतर्गत शेतात जाणारे व शेतीमाल वाहतुकीसाठी वापरले जाणारे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मजबुतीकरण करण्यात येणार आहे. रस्ते वर्षभर वापरण्यायोग्य राहतील यासाठी गुणवत्ता नियंत्रणाची विशेष तरतूद करण्यात आली आहे. शेत/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांकन, अतिक्रमण हटविणे व कायदेशीर कारवाई ही कामे ग्रामपंचायत, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून केली जाणार आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर त्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार आहे. वारंवार नुकसान केल्यास भारतीय न्याय संहिता कलम १२९ अन्वये कठोर कारवाईची तरतूद आहे. ही योजना ग्रामीण दळणवळण सुलभ करून शेती विकासाला चालना देणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने दूर करून योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा समिती सदस्य सचिव विलास नरवटे यांनी केले आहे.

7 hrs ago
user_Shivkumar kale Press reporter
Shivkumar kale Press reporter
Nanded, Maharashtra•
7 hrs ago
f7748d2e-5dd6-48c4-9570-469ecc31e440

*मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजनेला वेग* *अतिक्रमणमुक्त, बारमाही रस्त्यांसाठी शासनाची कडक भूमिका; नुकसान केल्यास फौजदारी कारवाई* नांदेड दि.१८ फेब्रुवारी:-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मजबूत, दर्जेदार व बारमाही शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंधार येथे विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार येथे संबंधित अधिकारी व यंत्रणांची बैठक घेऊन कामकाजाला गती देण्याच्या सूचना दिल्या. या योजनेअंतर्गत शेतात जाणारे व शेतीमाल वाहतुकीसाठी वापरले जाणारे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मजबुतीकरण करण्यात येणार

c9e1e475-a8f3-4048-9ced-3c8b76795a51

आहे. रस्ते वर्षभर वापरण्यायोग्य राहतील यासाठी गुणवत्ता नियंत्रणाची विशेष तरतूद करण्यात आली आहे. शेत/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, क्रमांकन, अतिक्रमण हटविणे व कायदेशीर कारवाई ही कामे ग्रामपंचायत, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून केली जाणार आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर त्याचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार आहे. वारंवार नुकसान केल्यास भारतीय न्याय संहिता कलम १२९ अन्वये कठोर कारवाईची तरतूद आहे. ही योजना ग्रामीण दळणवळण सुलभ करून शेती विकासाला चालना देणारी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने दूर करून योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा समिती सदस्य सचिव विलास नरवटे यांनी केले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
    4
    *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला*
नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी 
शिवकुमार काळे 
नांदेड:  गेला आणि 
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
ठळक वैशिष्ट्ये:
भव्य आतिशबाजी  रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता.
शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
पुतळ्याची सजावट  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.
आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    47 min ago
  • 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia
    1
    🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू
हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.
शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏
#सिरपल्ली
#हिमायतनगर
#शेतकरीसंकट
#आगघटना
#ग्रामीणवार्ता
#शासनमदत
#FarmerDistress
#मदतीचीगरज
#NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Actor माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती
    7
    मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते
दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला
यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे
गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.