Shuru
Apke Nagar Ki App…
तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मुख्यमंत्री पशुसंवर्धन विकास योजनेअंतर्गत मोफत शेळी पालन प्रशिक्षणाचे आयोजन कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात दिनांक 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पशुसंवर्धन विकास योजनेअंतर्गत मोफत शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणामध्ये पशुपालन व पशुसंवर्धनाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रथम येणाऱ्या ५०० शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून सहभागी शेतकऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे
Shankar mulgir
तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात मुख्यमंत्री पशुसंवर्धन विकास योजनेअंतर्गत मोफत शेळी पालन प्रशिक्षणाचे आयोजन कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात दिनांक 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पशुसंवर्धन विकास योजनेअंतर्गत मोफत शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणामध्ये पशुपालन व पशुसंवर्धनाशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रथम येणाऱ्या ५०० शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून सहभागी शेतकऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे
More news from Maharashtra and nearby areas
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले1
- श्री क्षेत्र माहुर गडावर परिक्रमा यात्रेसाठी लाखो भाविक दाखल भक्तांचा महासागर लोटला होता तसेच प्रशासनाचे नियोजन अपुरे पडल्याचे चित्र पहावयास मिळाले1
- हिदायत पटेल हत्याकांड में बड़ा अपडेट! फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत खारिज | High Court फैसला हिदायत पटेल हत्याकांड मामले में बड़ा अपडेट सामने आया है। बॉम्बे हाईकोर्ट की नागपुर बेंच ने आरोपी फाजील आसिफ खान की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी है। 24 अगस्त 2026 को दिए गए फैसले में कोर्ट ने उपलब्ध सामग्री के आधार पर प्रथमदृष्टया संलिप्तता का उल्लेख करते हुए गिरफ्तारी से पहले जमानत देने से इनकार किया। मामले में आरोपियों के बीच टेलीफोन पर बातचीत और अन्य कॉल रिकॉर्ड से जुड़े सबूत जांच के दौरान सामने आने की बात कोर्ट के समक्ष रखी गई। जांच एजेंसी की ओर से आरोपियों की कस्टोडियल पूछताछ को भी जरूरी बताया गया है। अब इस मामले की आगे की जांच और कोर्ट की कार्यवाही पर सभी की नजर है। 📍 हिदायत पटेल हत्याकांड की हर बड़ी और महत्वपूर्ण अपडेट के लिए जुड़े रहिए India News R7 के साथ। वीडियो पसंद आए तो Like 👍 करें, Share करें और India News R7 को Subscribe जरूर करें।1
- मधापुरीत प्रेमप्रकरणाचा थरार; तरुणाचा विहिरीत मृत्यू अन्... अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून गुरुवारी खळबळ उडाली. अनिश चव्हाण या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढले. घरी परतल्यानंतर तरुणीने विषप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्याने माना पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. एसआरपीचे पथकही दाखल झाले असून, दोघांचे नेमके नाते व घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.1
- *देगलूर येथील आधार केंद्र चालू करण्याच्या मागणीसाठी*शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने बोंब मारो आंदोलन संपन्न* देगलूर येथील पोस्ट ऑफीस मधील आधार कार्ड नोंदणी केंद्र गेल्या 4 महीन्या पासून बंद असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. सदरील केंद्र त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी देगलूर येथील पोस्ट ऑफिस समोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आधार केंद्र मागील 4 महीन्या पासून बंद असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस अधिकारी यांना घेराव घालून व नांदेडच्या मुख्य अधिक्षक पाठक, व उपमुख्य अधिक्षक कुलकर्णी यांना निवेदन देऊन आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अन्यथा पोस्ट ऑफीस समोर निदर्शने धरणे बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते, तरीपण अद्याप पर्यंत आधार केंद्र चालू न झाल्याने दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोस्ट ऑफीस समोर निदर्शने व बोंबा बोंब बोंबमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आधार केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या. शैक्षणिक व इतर शासकीय कामांसाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याने आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, लहान बालके, सकाळी पाच वाजतापासून सर्व कामधंदे सोडून भुकताण विसरून रांगेमध्ये उभे रहावे लागत होते, त्यामुळे 4 महिन्यांपासून बंद असलेले एकमेव आधार कार्ड नोंदणी केंद्र त्वरित चालू करण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोस्ट ऑफीस समोर तीव्र बोंबाबोंब बोंबमारो आंदोलन व निदर्शने करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलूरकर, मष्णाजी पैलावार, विनोद सोनकांबळे, अशोक कांबळे, मानाजी लोणे पाटील लोणीकर, गंगाधर पाटील चाकूरकर, राजु उल्लेवार,हाणमंत राजुरे लख्खेकर, संजय पाटील मंगरुळे लख्खेकर,अशोक मारवाडे कावळगड्डेकर, शिवाजी पाटील, दत्ता राजुरे.शिवाजी चव्हाण, शंकरराव जाधव, अर्जुन लूटे, राजु जाधव आदींसह इतर पदाधिकारी व स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशिक्षण पोलिस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यावेळी पोस्ट ऑफीसर पवार यांनी लवकरच आधार केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिले.2
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- प्रमुख मागण्या आहेत 2024 पासून करार झालेला असून त्या करारामध्ये हॉलिडेज बँकिंग पाच दिवसाचा आठवडाची मागणी1
- दर्यापूरच्या विविध मागण्यांसाठी ओम राणेंची मंत्रालयाकडे सायकलवारी निवेदनांना दाद न मिळाल्याने थेट मंत्रालय गाठण्याचा निर्णय; शिक्षण, शैक्षणिक इमारत आणि ट्रॉमा सेंटरसह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1