logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील संत श्रीपाद बाबा मंदिर, श्रीक्षेत्र घोटी बु. येथे सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य बाबुराव बाबा भागडे, ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे, उपाध्यक्ष मधुकर आण्णा आरोटे आणि सचिव अविनाशभाऊ हांडे यांनी श्रीफळ वाढवून हे भूमिपूजन केले. या प्रसंगी विश्वस्त झुंगाजी म. लायरे, विश्वस्त खंडुभाऊ पाबळकर, विश्वस्त विठ्ठलपंत भागडे यांच्यासह जंगलूभाऊ तोकडे, भोलेनाथभाऊ चव्हाण, बन्सीभाऊ गतीर, वामन बाबा वारघडे, प्रकाशभाऊ तोकडे, प्रकाश म. आरोटे, सुरेशशेठ वालझाडे, इंजी रविभाऊ पाटील, गणपत महाराज रेरे, पप्पूशेठ पुणेकर, किसन म. भागडे, रामभाऊ म. तोकडे, खंडु म. करटुले यांसारखे अनेक साधक आणि मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

1 hr ago
user_आई सत्पशृंगी
आई सत्पशृंगी
Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
57de5360-503c-4489-a422-86ade9878cfd
c48f8ac0-7a1e-4ba2-8aed-5ae6bfeca79c
4932aa54-384d-4de0-85cd-897381a20367
908e5d4c-9f91-4701-97c8-9748f4cd5933

नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील संत श्रीपाद बाबा मंदिर, श्रीक्षेत्र घोटी बु. येथे सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य बाबुराव बाबा भागडे, ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे, उपाध्यक्ष मधुकर आण्णा आरोटे आणि सचिव अविनाशभाऊ हांडे यांनी श्रीफळ वाढवून हे भूमिपूजन केले. या प्रसंगी विश्वस्त झुंगाजी म. लायरे, विश्वस्त खंडुभाऊ पाबळकर, विश्वस्त विठ्ठलपंत भागडे यांच्यासह जंगलूभाऊ तोकडे, भोलेनाथभाऊ चव्हाण, बन्सीभाऊ गतीर, वामन बाबा वारघडे, प्रकाशभाऊ तोकडे, प्रकाश म. आरोटे, सुरेशशेठ वालझाडे, इंजी रविभाऊ पाटील, गणपत महाराज रेरे, पप्पूशेठ पुणेकर, किसन म. भागडे, रामभाऊ म. तोकडे, खंडु म. करटुले यांसारखे अनेक साधक आणि मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील पोस्टमन श्रीराम कोंड यांनी 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी 1983 मध्ये पांडाणे येथील पोस्ट कार्यालयात आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पांडाणे येथील हनुमंत राय यांच्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
    2
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील पोस्टमन श्रीराम कोंड यांनी 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी 1983 मध्ये पांडाणे येथील पोस्ट कार्यालयात आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पांडाणे येथील हनुमंत राय यांच्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेदरम्यान ५८ लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांची वैधता आणि मराठा मंत्रालय यांसारख्या विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवण्याचा हा निर्णय घेतला.
    1
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

या चर्चेदरम्यान ५८ लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांची वैधता आणि मराठा मंत्रालय यांसारख्या विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवण्याचा हा निर्णय घेतला.
    user_महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    Local News Reporter Dindori, Nashik•
    13 hrs ago
  • ‘S ब्रेकिंग न्यूज एक्सक्लुझिव्ह’ने दिलेल्या विशेष बातमीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. काळाबाजारीचा आरोप असलेल्या एका PDS डीलरचे दुकान रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
    1
    ‘S ब्रेकिंग न्यूज एक्सक्लुझिव्ह’ने दिलेल्या विशेष बातमीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. काळाबाजारीचा आरोप असलेल्या एका PDS डीलरचे दुकान रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा तालुक्यातील चिखली येथील मारुती मंदिर आणि नरेंद्र महाराज दीक्षा केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पिठे, भास्कर हाडस, धनराज डंबाळे, गणपत भोये, स्वप्नील आहेर, तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
    1
    शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा तालुक्यातील चिखली येथील मारुती मंदिर आणि नरेंद्र महाराज दीक्षा केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पिठे, भास्कर हाडस, धनराज डंबाळे, गणपत भोये, स्वप्नील आहेर, तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दिंडोरी रोडवरील रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक दुकानदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे ग्राहकांनी या परिसरातील दुकानांकडे पाठ फिरवली असून, यामुळे दुकानदारांचे व्यवसायिक व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.
    1
    दिंडोरी रोडवरील रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक दुकानदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे ग्राहकांनी या परिसरातील दुकानांकडे पाठ फिरवली असून, यामुळे दुकानदारांचे व्यवसायिक व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.
    user_7083035346
    7083035346
    सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ज्या महिलांना वधु-वर सूचक कार्यालयात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी नेमणुका करण्यात येणार आहेत. इच्छुक महिलांनी या संधीसाठी आपली नावे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    ज्या महिलांना वधु-वर सूचक कार्यालयात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी नेमणुका करण्यात येणार आहेत. इच्छुक महिलांनी या संधीसाठी आपली नावे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_सचिन सुधाकर रत्नपारखी
    सचिन सुधाकर रत्नपारखी
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ओझर ग्रामपंचायतीचे अधिकारी युसुफ गुलाब शेख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक विशेष वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा वृत्तांत युसुफ गुलाब शेख यांच्या कर्मचारी ते ग्रामपंचायत अधिकारी अशा प्रेरणादायी सेवाप्रवासावर प्रकाश टाकतो.
    1
    ओझर ग्रामपंचायतीचे अधिकारी युसुफ गुलाब शेख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक विशेष वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा वृत्तांत युसुफ गुलाब शेख यांच्या कर्मचारी ते ग्रामपंचायत अधिकारी अशा प्रेरणादायी सेवाप्रवासावर प्रकाश टाकतो.
    user_महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    Local News Reporter Dindori, Nashik•
    21 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात ३० मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही संशयित व्यक्ती आलीशान गाड्यांमधून एका भगवे वस्त्र धारण केलेल्या मांत्रिकाला घेऊन घटनास्थळी आल्या होत्या. या टोळीने चिता जळत असलेल्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कंकू आणि तांत्रिक साहित्याचा वापर करून अघोरी पूजा केली. त्यानंतर ते काही संशयास्पद वस्तू घेऊन तेथून पसार झाले. मध्यरात्री गाड्यांचा संशयास्पद वावर पाहून रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव आणि त्यांच्या मित्रांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रा. अमोल बच्छाव यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "विज्ञानयुगातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्ये केली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. सटाणासारख्या सुजाण शहरात हे खपवून घेतले जाणार नाही!" या अघोरी कृत्याचा तीव्र निषेध करत, रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषींवर 'जादूटोणा विरोधी कायद्या' अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. घटनास्थळाची पाहणी करतेवेळी दत्ता पवार, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आणि इतर सहकारी उपस्थित होते.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात ३० मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही संशयित व्यक्ती आलीशान गाड्यांमधून एका भगवे वस्त्र धारण केलेल्या मांत्रिकाला घेऊन घटनास्थळी आल्या होत्या. या टोळीने चिता जळत असलेल्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कंकू आणि तांत्रिक साहित्याचा वापर करून अघोरी पूजा केली. त्यानंतर ते काही संशयास्पद वस्तू घेऊन तेथून पसार झाले.

मध्यरात्री गाड्यांचा संशयास्पद वावर पाहून रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव आणि त्यांच्या मित्रांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रा. अमोल बच्छाव यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "विज्ञानयुगातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्ये केली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. सटाणासारख्या सुजाण शहरात हे खपवून घेतले जाणार नाही!"

या अघोरी कृत्याचा तीव्र निषेध करत, रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषींवर 'जादूटोणा विरोधी कायद्या' अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. घटनास्थळाची पाहणी करतेवेळी दत्ता पवार, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आणि इतर सहकारी उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.