logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न पंढरपूर, दि. १७ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात दि. 16 सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताने तसेच भावपूर्ण अभंगगायनाने पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संगीत महोत्सवातील दुसरे गायन पुष्प पं. जयतीर्थ मेऊंडी यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्या तथा पंढरपूर नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकारांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पं. जयतीर्थ मेऊंडी यांनी रूपक तालातील गणपती स्तुतीने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यानंतर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र असलेल्या ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘विठ्ठल विसावा’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’, ‘तुज सगुण म्हणो की निर्गुण रे’, ‘आता कोठे धावे मन’, ‘आकार उकार मकार’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आदी रचना भावपूर्ण शैलीत सादर करून आपली गायनसेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली. या मैफिलीला तबला – ऋषिकेश जगताप, हार्मोनियम – माधव लिमये, पखवाज – ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ – माऊली पिसे तसेच स्वरसाथ – यतीन यांनी सुरेल साथसंगत केली. कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरस आणि संगीताच्या स्वरांनी भारावून गेले. संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरातील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय संगीत मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूरचा समृद्ध सांस्कृतिक व भक्तिसंगीताचा वारसा जपण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २०, २१, २२ व २३ सप्टेंबर रोजीही नामवंत व ख्यातनाम गायक-गायिकांची गायनसेवा विठुरायाच्या चरणी समर्पित होणार आहे. या संगीत मैफिलींचा आनंद घेण्यासाठी सर्व कलारसिक व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

2 hrs ago
user_Tej maharashtra varta
Tej maharashtra varta
पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
c59745fe-9a33-4373-b67f-bc238bd5baa8

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    1
    उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    user_Tej maharashtra varta
    Tej maharashtra varta
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    1
    बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    1
    🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    1
    कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत
कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    13 min ago
  • मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    1
    मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला
मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.