logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विमानतळासाठी जमीनी न देण्यावर शेतकरी ठाम; खासदार किरसानांशी संवाद विमानतळासाठी जमीनी न देण्यावर शेतकरी ठाम; खासदार किरसानांशी संवाद प्रतिनिधी हिरापूर ता. जि. गडचिरोली गडचिरोली: (दि १०) हिरापूर येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी विमानतळ किंवा इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता आपल्या शेतजमिनी द्यायच्या नसल्याची ठाम भूमिका मांडली. कोणत्याही प्रकारचे प्राथमिक अथवा इतर सर्वे करण्यात येऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. असे असतानाही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा व इतर माध्यमांचा दबाव आणून प्रस्तावित शेत अधिग्रहणासाठी सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांनी शेती हेच आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे सांगत अधिग्रहणामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी व भीती व्यक्त केली. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या व शासन स्तरावर या प्रश्नाचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच त्यांच्या हक्कासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करण्यात येईल, असा विश्वास खासदार डॉ. नामदेव किरसान आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
95b84209-c261-4214-9b45-ec6499041eab

विमानतळासाठी जमीनी न देण्यावर शेतकरी ठाम; खासदार किरसानांशी संवाद विमानतळासाठी जमीनी न देण्यावर शेतकरी ठाम; खासदार किरसानांशी संवाद प्रतिनिधी हिरापूर ता. जि. गडचिरोली गडचिरोली: (दि १०) हिरापूर येथे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी विमानतळ किंवा इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता आपल्या शेतजमिनी द्यायच्या नसल्याची ठाम भूमिका मांडली. कोणत्याही प्रकारचे प्राथमिक अथवा इतर सर्वे करण्यात येऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. असे असतानाही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा व इतर माध्यमांचा दबाव आणून प्रस्तावित शेत अधिग्रहणासाठी सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांनी शेती हेच आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे सांगत अधिग्रहणामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी व भीती व्यक्त केली. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या व शासन स्तरावर या प्रश्नाचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच त्यांच्या हक्कासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करण्यात येईल, असा विश्वास खासदार डॉ. नामदेव किरसान आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रतिनिधी हिंगणा नागपुर कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.
    1
    कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी हिंगणा नागपुर 
कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे.
पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.
    1
    शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… 
मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे.
आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।।
- द किरण माने.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    2
    मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    user_BEBAAK NEWS ONLINE
    BEBAAK NEWS ONLINE
    रामबाग, नागपूर•
    12 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.
    1
    महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.
    1
    नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भंडारा शहरात मध्यरात्री कार्तिक भंडारी या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादामुळे दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याने ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी काही तासांतच चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण आठ संशयितांची चौकशी सुरू आहे.
    1
    भंडारा शहरात मध्यरात्री कार्तिक भंडारी या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. जुन्या वादामुळे दाखल केलेली तक्रार मागे न घेतल्याने ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी काही तासांतच चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण आठ संशयितांची चौकशी सुरू आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • महाराष्ट्रात आमदार आशीष देशमुख यांनी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याची संकल्पना मांडली आहे. नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून मुरूम मिळाल्यास एकीकडे दर्जेदार रस्ते तर दुसरीकडे प्रभावी जलसंधारणाचे काम होईल. यामुळे भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे दुष्काळ निवारणात मदत होईल.
    1
    महाराष्ट्रात आमदार आशीष देशमुख यांनी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याची संकल्पना मांडली आहे. नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून मुरूम मिळाल्यास एकीकडे दर्जेदार रस्ते तर दुसरीकडे प्रभावी जलसंधारणाचे काम होईल. यामुळे भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे दुष्काळ निवारणात मदत होईल.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.