लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी रविवारी (दि. १२) नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिराच्या सभामंडपात पूजा आणि अभिषेक केला. या दर्शनापूर्वी त्यांनी कुशावर्त तीर्थावर जाऊन गंगाभेट केली आणि त्यानंतर ते मंदिरात दाखल झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मंदिर विश्वस्त रूपाली भुतडा, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याच्या एका बाजूनेच दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच लोकसभा सभापतींच्या वाहनांचा ताफा याच रस्त्यावरून ये-जा करणार असल्याने, दर्शनासाठी आलेले भाविक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील इतर रस्ते खोदून ठेवलेले असताना, वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव रस्त्यावर पोलीस बंदोबस्तामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी रविवारी (दि. १२) नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यांनी मंदिराच्या सभामंडपात पूजा आणि अभिषेक केला. या दर्शनापूर्वी त्यांनी कुशावर्त तीर्थावर जाऊन गंगाभेट केली आणि त्यानंतर ते मंदिरात दाखल झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मंदिर विश्वस्त रूपाली भुतडा, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त तीर्थ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या रस्त्याच्या एका बाजूनेच दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच लोकसभा सभापतींच्या वाहनांचा ताफा याच रस्त्यावरून ये-जा करणार असल्याने, दर्शनासाठी आलेले भाविक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील इतर रस्ते खोदून ठेवलेले असताना, वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव रस्त्यावर पोलीस बंदोबस्तामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
- उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवे बळ देणाऱ्या अत्याधुनिक अशोका हेल्थ सिटी आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अशोका हेल्थ सिटी ही केवळ उपचारांची संस्था न राहता वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनावे. तसेच, या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना आधुनिक सुपर स्पेशालिटी आरोग्यसेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.1
- नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी टवाळखोरांच्या विरोधात केलेल्या कडक कारवाईचे शहरभरात कौतुक होत आहे. या कारवाईनंतर आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची भेट घेऊन पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा केली. या भेटीदरम्यान त्यांनी मागणी केली की, ज्याप्रमाणे टवाळखोरांच्या विरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर भद्रकाली परिसरात कथित स्वरूपात सुरू असलेल्या अवैध जुगार, मटका आणि सट्ट्याच्या धंद्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेले चालक आणि खेळाडू यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांच्या यापुढील कारवाईकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- दिंडोरी तालुक्यातील वणी येथील शंकेश्वर मंदिर येथे आज साध्वी आणि महंतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी वणी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- नाशिक–पळसन मार्गावरील एसटी बस सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा फाटा येथे अचानक पंक्चर झाली, मात्र बसमध्ये टायर बदलण्यासाठी आवश्यक असलेला जॅकच उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे तासन्तास हाल झाले. या महत्त्वाच्या साधनसामग्रीअभावी बस दुरुस्तीचे काम जागेवरच खोळंबले. परिणामी, बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करत रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले. एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात जॅकसारखे मूलभूत साहित्यही उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून, यामुळे एसटी महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अभावामुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाया गेला नाही, तर चालक आणि वाहकालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व बसमध्ये आवश्यक साधनसामग्रीची खात्री करावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।2
- येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची आणि स्थानिक नागरिकांची त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावर निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य आता संपले असले, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर 'धुळीचे साम्राज्य' पसरले आहे. या उडणाऱ्या धुळीमुळे ये-जा करणारे प्रवासी कमालीचे हतबल झाले असून नागरिक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या अत्यंत संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिक आधीच त्रस्त होते. पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर आता चिखल सुकल्यानंतर रस्त्यावर धूलिकणांचे प्रचंड मोठे थर साचले आहेत. महामार्गावरून जड वाहने किंवा एसटी बस गेल्यास एवढी प्रचंड धूळ उडते की, मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना समोरील रस्ता दिसणे कठीण होते. अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या 'ब्लाइंड स्पॉट'मुळे या महामार्गावर लहान-मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेला असणारे हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना बसत आहे. दुकानांमधील साहित्यावर धुळीचे थर साचत असल्याने व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, सतत उडणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांना श्वसनाचे आजार, खोकला आणि डोळ्यांचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.1
- नाशिकच्या सातपूर परिसरातील बहुचर्चित 'गोल्ड मॅन' जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत मुख्य आरोपीला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथून अटक केली आहे. राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास 'गोल्ड मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिर्यादी हे आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवले होते. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या वाहनात प्रवेश केला आणि धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमालही जप्त केला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राकेश सोनार हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता. गुन्हेशाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राकेश सोनार पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले आणि त्यांनी चोहोली फाटा परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर तसेच डॉ. समाधान हिरे, यशवंत बेडकोळी, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.3
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.2