नारगावंडी सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जिल्ह्यात ४१ सौर प्रकल्पातून होणार १८४ मेगावाट ऊर्जा निर्मिती जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर प्रकल्पाला गती द्यावी* _जिल्हाधिकारी सौरभ कटीयार_ अमरावती, दि.०८ जानेवारी २०२५; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४१ उपकेंद्रासाठी १८४ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे ७ ठिकाणी काम सुरू झाली आहेत.उर्वरित कामे तातडीने सुरू होणार आहे.शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. ६) जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजीता मोहपात्रा, महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सर्व कार्यकारी अभियंते, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) तायडे आणि सौर ऊर्जा प्रकल्प विकासक उपस्थित होते. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा, अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा शक्य होणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ८४० एकर शासकीय जमीनीचे अधीग्रहन करण्यात आले आहे. या जमीनिवर ४४ ठिकाणी ४१ उपकेंद्रासाठी विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून या प्रकल्पातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. तथापि या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी तत्काळा सोडविण्यासंदर्भात जिल्हयातील सर्व तहसिलदार यांना सुचित करून मदत करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अवगत केले. नारगावंडी (धामणगाव रेल्वे) येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी* मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धामणगाव तालुक्यातील नारगावंडी येथे प्रगतीपथावर असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी आज (दिनांक ८ जाने.) प्रत्यक्ष पाहणी केली आणि मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत प्रकल्प विकासकांना आदेश दिलेत. यावेळी चांदुर रेल्वेचे महसुल उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, धामणगाव (रेल्वे), तहसीलदार अभय घोरपडे महावितरण चे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर,तसेच सर्व विकासक हजर होते.
नारगावंडी सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जिल्ह्यात ४१ सौर प्रकल्पातून होणार १८४ मेगावाट ऊर्जा निर्मिती जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर प्रकल्पाला गती द्यावी* _जिल्हाधिकारी सौरभ कटीयार_ अमरावती, दि.०८ जानेवारी २०२५; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४१ उपकेंद्रासाठी १८४ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे ७ ठिकाणी काम सुरू झाली आहेत.उर्वरित कामे तातडीने सुरू होणार आहे.शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती देण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात (दि. ६) जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संजीता मोहपात्रा, महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, सर्व कार्यकारी अभियंते, विभागीय महाव्यवस्थापक (महाऊर्जा) तायडे आणि सौर ऊर्जा प्रकल्प विकासक उपस्थित होते. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे
कृषी पंपांना दिवसा, अखंडीत व शाश्वत वीजपुरवठा शक्य होणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ८४० एकर शासकीय जमीनीचे अधीग्रहन करण्यात आले आहे. या जमीनिवर ४४ ठिकाणी ४१ उपकेंद्रासाठी विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून या प्रकल्पातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. तथापि या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी तत्काळा सोडविण्यासंदर्भात जिल्हयातील सर्व तहसिलदार यांना सुचित करून मदत करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अवगत केले. नारगावंडी (धामणगाव रेल्वे) येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी* मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धामणगाव तालुक्यातील नारगावंडी येथे प्रगतीपथावर असलेल्या सौर प्रकल्पाच्या कामाची जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी आज (दिनांक ८ जाने.) प्रत्यक्ष पाहणी केली आणि मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत प्रकल्प विकासकांना आदेश दिलेत. यावेळी चांदुर रेल्वेचे महसुल उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, धामणगाव (रेल्वे), तहसीलदार अभय घोरपडे महावितरण चे अधिक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर,तसेच सर्व विकासक हजर होते.
- भाई कर्माचं सरळ आणि सोप गणित आहे ना औ1
- Amravati News |100 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या तीघांना अटक..1
- 🔴मोठी बातमी,कापूस भाव;अमरावती,अकोला ७६९९ रु.,08 जानेवारी,1
- स्नेहसंमेलन मध्ये नृत्य सादर करतांना संच नांदगाव खंडेश्वर1
- नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर .1
- 🎯Target Institute chandur railway☺1
- तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र सार्सी(गाईची) गौमाता बद्दल इतिहास,काय आहे .1
- अमरावती.. तिवसा येथे धम्म शील यात्रा निमित्ताने कवी संमेलन1
- अमरावती - तिवसा येथे पंचशील धम्म यात्रा तिवसा शहरात शांती संदेश रॅली1