लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा 2025 चा खरीप पिक विमा तात्काळ मंजूर करून शेतकर्यांना न्याय द्यावा - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर लातूर दि.11-05-2026 लातूर जिल्ह्यातील 712000 शेतकर्यांनी 454400 हेक्टरवरील खरीप पिकांसाठी 712000 शेतकर्यांनी आयसीआयसीआय लोबार्ड इन्शूरन्स कंपनीकडे पिक विमा भरला होता. पंरतु किरकोळ कारणामुळे खरीपाचा मिळणारा पिकविमा नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील लाखो शेतकर्यांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी याकडे लक्ष देऊन लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा 2025 चा खरीप पिकविमा तात्काळ मंजूर करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे दिलेले आहे. लातूर जिल्ह्यातील 434739 शेतकर्यांनी 454400 हेक्टरवरील पिकापोटी 712000 शेतकर्यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड इंन्शूरंन्स कंपनीकडे विमा मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. पंरतु कपंनीने मात्र लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकर्यांचेही प्रस्ताव नाकारले आहेत. या कंपनीने पिक कापनी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे वजन मिसमॅच झाले, रँडम नंबर योग्य वापरला नाही, प्लॉट चुकीचे निवडले, मळनी व्यवस्थित केली नाही, चुकीचे वजन घेतले, पिक कापनी प्रयोग झाले तिथे पिकच नव्हते, असे चुकीचे उत्तर देऊन तिनही जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप 2025 चा पिकविमा नाकारण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे शेतकर्यांवर कंपनीकडून अन्यायकारी झालेल्या पिकविमा प्रक्रियेची सखोल चौकशी करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1