*दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या* असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात. दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सचिव मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्तीचा विवाह ही पालकांच्या दृष्टीने जिकिरीची जबाबदारी बनते. अनेकदा विवाह टाळला जातो किंवा विजोड जोडीदार दिला जातो. विशेषतः दिव्यांग महिलांना महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शासन, सामाजिक व स्वयंसेवी संस्था दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेत वाढ करण्यासह दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी रुपये १,५०,००० तर दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी रुपये २,५०,००० इतके अनुदान मिळणार आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभहस्तांतरण प्रणालीद्वारे जमा केली जाणार असून, त्यापैकी ५० टक्के रक्कम दाम्पत्याने पाच वर्षांकरिता मुदतठेवीत ठेवणे अनिवार्य असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले. योजनेच्या प्रमुख अटी वधू अथवा वर दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) धारण आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा तसेच वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे. पात्र लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येईल. मंजूर लाभार्थ्यांची यादी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडे पाठवून निधी वितरित केला जाईल. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- RaGa heart touching speech 💬💛1
- उत्तर प्रदेश के कन्नौज में तैनात ट्रैफिक सब-इंस्पेक्टर मोहम्मद आफाक क्यों हुए निलंबित? #viral #viralreels #uttarpradesh1
- नाशिक आग्रा हाइवे उड़न पुला वर बस ला भीषण आग अग्निशमन दलाने आणली आटोक्यात आग #swarajyavarta #marathinews #maharashtranews #news #vairalvideo #shortsvideos #treding #jalnakar1
- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- *🛑विकासाचे सर्व संकल्प पराग संधान यांच्या मार्फत आम्ही पूर्ण करू--- नाम.चंद्रंशेखर बावनकुळे.* *👉 सभेला मोठा जनसमुदाय,,कोपरगावची लक्ष्मी कमळावर बसून येणार .*1
- वेगवान कारची दुचाकीला जोरदार धडक अहमदाबादमधील घटना1
- धुळे शिरपूर जळालेल्या कार मध्ये आढळला मानवी सांगडा2