जालना येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या २० गोवंशीय जनावरांची कादीम जालना पोलिसांनी सुटका केली आहे. जुन्या जालन्यातील मोरंडी मोहल्ला भागात मंगळवारी रात्री उशिरा धाडसी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी सुमारे ६ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, मोरंडी मोहल्ला येथील मुजम्मील व गफार कुरेशी यांच्या वाड्यात विनापरवाना मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंडून ठेवण्यात आली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २६ मे २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ७ गो-हे, ज्यांची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये (प्रत्येकी २५ हजार रुपये), आणि १३ बैल, ज्यांची अंदाजे किंमत ५ लाख २० हजार रुपये (प्रत्येकी ४० हजार रुपये) असे एकूण २० गोवंशीय जनावरे मिळून आली. या प्रकरणी शेख जुबेर शेख फिरोज आणि ग्यासोद्दीन कमरोद्दीन कुरेशी, दोन्ही मोरंडी मोहल्ला, जुना जालना येथील रहिवासी, यांच्यावर कादीम जालना पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७८/२०२६ नुसार प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ९ आणि प्राण्यांना छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई जालना पोलीस अधीक्षक मा. श्री. तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे, सपोनि अविनाश गडाख, सपोनि अमित मस्के व त्यांच्या पथकाने पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रतिभा पांडुरे करत आहेत.

- पुण्यातील विकाश नगर देहूरोड विभागाच्या भीमा शंकर कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.4
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.1
- घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.1
- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.1
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.1
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.1
- विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.1