पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा मोटर्स यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार १८ माध्यमिक शाळांमध्ये सर्वांगीण शिक्षण बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल पिंपरी, १८ फेब्रुवारी २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १८ माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने टाटा मोटर्स, पुणे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिकेच्या शिक्षण विभागासोबत तीन वर्षांचा अशासकीय सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे शाळा शिक्षण व्यवस्थेत शाश्वत व परिणामकारक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आखण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रसार, शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास आणि शाळा प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. सामंजस्य करार स्वाक्षरी सोहळ्यास महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, टाटा मोटर्स व टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व विभागातील प्रतिनिधी तसेच सुप्रभात महिला मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सहकार्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ घडवून आणण्याचा संकल्प करण्यात आला असून, पूरक अध्यापन वर्गांचे आयोजन, विज्ञान–तंत्रज्ञान–अभियांत्रिकी–गणित आधारित शिक्षणाला प्रोत्साहन आणि डिजिटल साक्षरतेचा विकास करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निकालांमध्ये सकारात्मक सुधारणा साध्य केली जाणार आहे. यासोबतच क्रीडा, कला, विज्ञान प्रकल्प, नवोपक्रम उपक्रम आणि इतर सहशालेय कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली जाईल. शिक्षकांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यशाळा व क्षमता-विकास कार्यक्रम राबवून आधुनिक अध्यापन तंत्रांचा अवलंब केला जाणार असून, त्यामुळे वर्गखोल्यांतील शिक्षण अधिक परिणामकारक होईल. तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांना बळकटी देत नियोजन, देखरेख, पारदर्शकता आणि पालक-समुदाय सहभाग अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या कार्यआराखड्यानुसार विविध घटकांच्या स्पष्ट भूमिका निश्चित करण्यात आल्या असून, महापालिकेकडून अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा वापर तसेच पूरक वर्गांसाठी आवश्यक जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीजकडून तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल शिक्षण उपकरणांची उपलब्धता व आवश्यक तांत्रिक सहकार्य दिले जाणार आहे, तर टाटा मोटर्सकडून इंग्रजी, गणित, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विषयांसाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती तसेच सहशालेय उपक्रमांसाठी समन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुप्रभात महिला मंडळ (प्रथमची भगिनी संस्था) यांचे सहकार्य लाभणार असून, शैक्षणिक हस्तक्षेप आणि समुदाय सहभाग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. *कोट* पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा मोटर्स यांच्यात तीन वर्षांचा सामंजस्य करार हा केवळ शैक्षणिक सुधारणांचा उपक्रम नसून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रसार, शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास आणि शाळा प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक, आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस आणि दूरदर्शी पाऊल ठरणार आहे. रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका *कोट* महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांसाठी टाटा मोटर्स आणि टाटा टेक्नॉलॉजीज यांच्यासोबत झालेला हा तीन वर्षांचा सामंजस्य करार हा गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भागीदारीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणणे, पूरक अध्यापन वर्गांद्वारे निकाल उंचावणे तसेच विज्ञान–तंत्रज्ञान–अभियांत्रिकी–गणित आधारित शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेला चालना देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. — ममता शिंदे, उपायुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका

- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.1
- Post by Prasad Panchal1
- साडीतील नृत्याने सोशल मीडियावर धूम अरुणिमा देवांसीस ठरल्या वायरल डान्स टीचर1
- रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी... NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1