साळवे इंग्रजी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी. साळवे | प्रतिनिधी साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री एस. डी. मोरे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्य व कर्तृत्वाचा तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विश्ववंदनीय कार्याचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.प्रतिभा पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा इतिहास प्रभावीपणे मांडला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य व प्रेरणादायी विचारांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. रंजना मॅडम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे सादर केली. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाट्यछटा व गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साळवे इंग्रजी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी. साळवे | प्रतिनिधी साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री एस.
डी. मोरे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्य व कर्तृत्वाचा तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विश्ववंदनीय कार्याचा गौरवशाली इतिहास उलगडून सांगितला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.प्रतिभा पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवाजी
महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा इतिहास प्रभावीपणे मांडला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य व प्रेरणादायी विचारांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. रंजना मॅडम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे सादर केली. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी
सादर केलेली नाट्यछटा व गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले2
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- Post by YUVA JALNA NEWS1
- सीमारेषेवर पाकिस्तानची पुन्हा कुरापत जम्मू कश्मीर मध्ये ड्रोन घुसखोरी2
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले1