logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली लावा! सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली लावा! (महापौर निता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश) नागपूर, ता. १५: नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या प्रलंबित असलेल्या समस्या तातडीने निकाली लावण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात बुधवारी (ता.१५) सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त श्री. राजेश भगत, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त सुकेशणी तेलगोटे, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी महापौर निता ठाकरे यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सफाई कामगारांचे १९७५ पासून ते सद्यस्थितीपर्यंत असलेले प्रलंबित प्रकरणे, खारीज प्रकरणे, ऐवजदार आणि अधिसंख्य प्रकरणे मार्गी लावण्याकरिता सकारात्मक विचार करण्यात यावा. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी झोन स्तरावर किंवा मनपा शाळांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करावी, असेही त्यांनी सुचविले. यासोबतच मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा, आरोग्य विमा योजना लागू करावी आणि रिक्त पदांची भरती करण्याबाबत मनपाने सकारात्मक निर्णय घ्यावा, आदी मागण्या सतीश डागोर यांनी बैठकीत मांडल्या. यावर महापौर निता ठाकरे यांनी सफाई कामगारांचे सर्व प्रलंबित प्रकरण तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन सतीश डागोर यांना दिले. तसेच मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी देखील प्राधान्यक्रमानुसार सफाई कामगारांचे सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले.

10 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
10 hrs ago
6d7470f6-1b8c-4d6d-9bab-dec05a8c5f73

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    1
    नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    45 min ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    1
    नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.