बहुजन समाज पार्टी नायगाव विधानसभा अध्यक्षपदी राजकुमार सोनकांबळे यांची निवड नरसी (प्रतिनिधी) : बहुजन समाज पार्टी नायगाव विधानसभा अध्यक्षपदी नायगाव येथील धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार किशन सोनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह नरसी येथे आयोजित बैठकीत बहुजन समाज पक्षाच्या नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदार संघासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे, नांदेड जिल्हा अध्यक्ष सुभाष भोकरे आणि नांदेड महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर, पत्रकार प्रकाश कामळजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा प्रभारी - देविदास महाजन जेठेवाड, अविनाश पुंडलिकराव इटकापल्ले, महासचिव - मनोहर गंगाराम डुमणे, उपाध्यक्ष - ओमप्रकाश बळी वाघमारे, लिंगायत भाईचारा कमिटी - मुकुंदा लक्ष्मण चोंडेकर आणि नायगाव शहराध्यक्ष - बंटी नायगावकर. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. पक्षाचे काम नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील सर्व भागात वाढविण्याचा निर्धार यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- Post by वैजनाथ पावडे1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1