प्र.सा.पहिलवान सरांचे कार्य पुढे न्यावे: डाॅ अमृतसा पहिलवान प्रतिनिधी सचिन वखारे येवला येवला=एक आदर्श शिक्षक म्हणून प्र.सा.पहिलवान सर कायम स्मरणात राहतील.स्वामी मुक्तानंद विद्यालय जडणघडणीत योगदान देणारे पहिलवान सर अद्वितीय होय.अनेक विद्यार्थी सरांनी घडवले.संस्थेची प्रगती केली.नगराध्यक्ष ते पतसंस्था संस्थापक असे त्यांचे कार्य पवित्र आहे;असे प्रतिपादन श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ अमृतसा पहिलवान यांनी केले.शहरातील सुप्रसिद्ध स्वामी मुक्तानंद विद्यालयात आयोजित पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीपर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष श्रीमती शकुंतलाताई पहिलवान, सचिव संजय नागडेकर ,खजिनदार सुधांश खानापुरे, ज्येष्ठ संचालक दीपक गायकवाड,संचालक डाॅ अमोल पहिलवान, सभासद दत्तात्रय नागडेकर ,डाॅ किरण पहिलवान,तेजस गायकवाड प्रवीण नागडेकर अमोल एंडाईत तसेच सौ सुमन पहिलवान उपस्थित होते.ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.संजय नागडेकर व दीपक गायकवाड तसेच विद्यार्थी स्वराज गळलिंबे,शिक्षक प्रा. दीपक खरे यांनी स्वर्गीय पहिलवान सरांच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले. ओम् पैठणकर ,निरंजन नागपुरे ,राहुल चव्हाण या खेळाडूंचा कराटे खेळात राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्तीबद्दल यांना कै.सारंगधरसा मेमोरियल ट्रस्ट तर्फे एक हजार रोख व स्मृतीचिन्ह ,पालक व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य एम.टी.कदम यांनी प्रास्ताविक केले.उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील विद्यार्थी यांचेकरिता कार्यकौशल्य महोत्सव उद्घाटन यावेळी झाले.कार्यक्रम सूत्रसंचालन उत्सवप्रमुख व संस्कृत विभाग प्रमुख पं डाॅ प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भागवत यांनी केले.दरम्यान विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले होते.त्याचा विद्यार्थी यांनी लाभ घेतला.तीन विजेते उपकरणे तालुकास्तरावर सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमास उपप्राचार्य अरूण विभूते,पर्यवेक्षक श्री.सुरेश मोहिते,राजेंद्र सोनवणे,वरीष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ मनोहर पाचोरे,हुडको प्राथमिक मुख्याध्यापक किरण जाधव,प्राथमिक मुख्याध्यापक डी.व्ही.खोजे,इंग्रजी माध्यम प्राचार्य युवराज काशिद तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवार ता.३रोजी आनंदमेळावा तर शनिवारी ता.४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम व सोमवार ता.६ जानेवारी२०२५रोजी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष डॉ अमृतसा पहिलवान यांनी दिली.