अण्णाभाऊ साठे यांच्यावर आंबेडकरी विचारांचा मोठा प्रभाव होता आंबेडकरी विचारांचे खरे पाईक अण्णाभाऊ साठे- प्रा. डॉ. गजानन मंदावाड उदगीर (प्रतिनिधी) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या सत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. बंकट कांबळे तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. लेखन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथप्रदर्शनासही भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रंथप्रदर्शनात अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले निवडक साहित्य, त्यांच्या साहित्याच्या समीक्षा-चरित्राचा समावेश होता. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचे सदस्य ग्रंथप्रदर्शनाला भेट देत वाचनाचा आनंद घेतला. दुपारच्या सत्रात प्रा. मंदावाड यांनी आंबेडकरी विचार, साहित्य आणि सामाजिक चळवळींचा आढावा घेतला. अण्णा भाऊ साठे यांच्या विस्तृत साहित्याकृत्या (35 कादंबरी, शेकडो कथा, प्रवासवर्णने, लोकनाट्ये) ला त्यांनी आंबेडकरी विचारांचा महत्त्वाचा आधार मानले. साठे यांच्या कथांच्या नायका समाजातील अन्यायाची लढाई लढणारे दाखवले आहेत; त्यांच्या लेखनातून मिल कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळींचे प्रतिबिंब दिसते. टिळकांविषयी मंदावाड म्हणाले की त्यांनी शैक्षणिक चळवळ (न्यू इंग्लिश शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी), केशरी–मराठा माध्यमातून राजकीय आघाडी घेतली, होमरुल व स्वराज्य-स्वदेशीचा प्रचार केला आणि अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांनी टिळक, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांमधील साम्य–असम्य मुद्दे उलगडले. प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी साठे यांच्या साहित्यात जातीधर्माच्या भिंती मोडून समाजकार्य करण्याचा संदेश असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. जी. जेवळीकर यांनी केले; आभारप्रदर्शन प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी केले.

- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली. साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली.1