मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर रस्ता मार्गी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्य रस्त्याच्या कामाला प्रारंभ; डॉ. अंकुश लाड यांच्या पुढाकाराने विकासकामांना वेग मानवत (प्रतिनिधी) :- मानवत शहरातील प्रभाग क्रमांक २, ५ आणि ८ यांना जोडणाऱ्या ‘मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर’ या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शहरातील प्रलंबित विकासकामांना पुन्हा गती मिळाल्याचे या निमित्ताने दिसून आले असून हा रस्ता नागरी दळणवळणाबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मानवत शहरालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या रस्त्याच्या कामाकडे नागरिकांसह शेतकरी वर्गाचे विशेष लक्ष लागले होते. रस्ता दुरुस्त व सुस्थितीत झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण, कृषी अवजारे वाहून नेणे तसेच शेतात ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. या प्रसंगी बोलताना डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले की, मागील काळात शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली होती; मात्र हा रस्ता काही कारणांमुळे प्रलंबित राहिला होता. नागरिकांना दिलेला शब्द पाळत आवश्यक निधी उपलब्ध करून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण केले जाईल. या रस्त्यामुळे तिन्ही प्रभागांतील दळणवळण सुलभ होण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. लाड पुढे म्हणाले की, हा मार्ग शहरातील अनेक नागरिकांसाठी दैनंदिन वापराचा असून सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होते. त्यामुळे रस्ता चांगल्या स्थितीत असणे अत्यंत आवश्यक होते. “काम करत आलोय, काम करत राहू” या भूमिकेतून मानवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले. रस्ता कामाच्या शुभारंभावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. अंकुश लाड यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक संजय बांगड, विष्णूपंत आळसपुरे, गणेश वासुंबे, बाळासाहेब मोरे, दत्तराव चौधरी, मोहन लाड, नियामत खान, जमीलभाई सय्यद, रहीमभाई बागवान, अफसरभाई अन्सारी, डॉ. राजेश्वर दहे, किशोर लाड, बाजीराव हालनोर, विनोद रहाटे, राजकुमार खरात, गणेश उगले, स्वप्नील शिंदे, अभिषेक आळसपुरे, गणेश कुमावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच राजुभाऊ सोरेकर, नागनाथ टेहरे, गणेश दहे, नंदकिशोर कच्छवे, प्रशांत बुरांडे, संदीप भाकरे, आशिष बुरांडे, नंदूभाऊ भायेकर, अमर बारटक्के, ओंकार राप्पेल्लेवर, विनायक रोपेल्लेवर, विकास भायेकर, अक्षय टेहरे, आबा बंडे, नारायण कच्छवे, संजय हजारे, संकेत हजारे, विनायक वावदाणे, शिवाजी लेंगुळे, सुभाष भायेकर, किरण गुंडाळे, अमोल गायके, जयराम वडे, गणेश बंडे, समर्थ बंडे, अजिजभाई बागवान, बसीरभाई बेलदार, यूनुसभाई बागलानी, रफिकभाई बेलदार, सुलेमान बागवान, मुन्सर बेलदार, वहाब कुरेशी, वसीम कुरेशी, बब्बू सय्यद, रहेमत शेख, शेख मजहर, सलीम अन्सारी, मसूद अन्सारी, इम्रान खान, बाबूभाई, आयुब कुरेशी, सद्दाम खान आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभाग २, ५ आणि ८ मधील दळणवळण अधिक सुरळीत होणार असून शहरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होऊन शेतकऱ्यांचा शेतापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार असल्याने या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

- मंठा प्रतिनिधी मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शेतकरी शिवाजी चंदू राठोड यांच्या शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना दि. ९मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली असून गट क्रमांक 219 मधील त्यांच्या दीड एकर शेतातील गहू जळून खाक आहे . मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही क्षणातच आगीने उभ्या गव्हाच्या पिकाला वेढा घातला. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दीड एकर क्षेत्रातील गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले. या आगीत शेतकरी शिवाजी राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच वीज विभागाने शेतातील वीजवाहिन्यांची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.1
- राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज1
- Post by Raghunath Aghao1
- Post by Nanded_71
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- Communist Party Protests Against US-Israel Attack on Iran2
- Post by Nanded_71
- आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत रस्ते सोयी सुविधा या संदर्भात लक्षवेधी मध्ये सरकारचे लक्ष वेधले.. #DevendraFadnavis #EknathShinde #ArjunKhotkar1