logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आलापल्ली ते सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम भ्रष्टाचार आणि निकृष्टतेचे 'नंबर वन' उदाहरण बनले आहे. ठेकेदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमतामुळे हा महामार्ग आता सामान्य जनतेच्या जीवावर उठला असून, पुलांच्या बांधकामातील तांत्रिक हेराफेरीमुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील पुलांच्या बांधकामात 'जुगाड' (अयोग्य पद्धती) वापरले जात असल्याचे समोर आले आहे. पुलाचा पाया (राफ्ट) एका ठिकाणी टाकून मुख्य भिंत (वॉल) दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात आहे. हा तांत्रिक घोळ उघडकीस आल्यानंतर, कंत्राटदाराने आपली चूक लपवण्यासाठी राफ्ट 'टाचे मारून' (पॅचवर्क करून) वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मूळ रचनेत नसताना केवळ असे थापे मारून वाढवलेला राफ्ट भविष्यात ४० ते ८० टनांची जड वाहने कशी पेलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकल्पावर देखरेख ठेवणाऱ्या कन्सल्टन्सी आणि सरकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराशी आर्थिक साटेलोटे केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. डिझाइन आणि मानांकनांची पायमल्ली होत असतानाही, कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कामाला 'ओके' प्रमाणपत्र दिल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज जड वाहनांची मोठी वर्दळ असते. नुकत्याच झालेल्या पावसात तात्पुरते रस्ते वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, मुख्य पुलांचे बांधकामच पोकळ आणि नियमबाह्य असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या निकृष्ट कामाची तातडीने तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

6 hrs ago
user_विवेक मीरालवार
विवेक मीरालवार
Pharmacist अहेरी, गडचिरोली, महाराष्ट्र•
6 hrs ago
a859a3ec-86e2-4a2e-b7d2-53eca74a713a

आलापल्ली ते सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम भ्रष्टाचार आणि निकृष्टतेचे 'नंबर वन' उदाहरण बनले आहे. ठेकेदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमतामुळे हा महामार्ग आता सामान्य जनतेच्या जीवावर उठला असून, पुलांच्या बांधकामातील तांत्रिक हेराफेरीमुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील पुलांच्या बांधकामात 'जुगाड' (अयोग्य पद्धती) वापरले जात असल्याचे समोर आले आहे. पुलाचा पाया (राफ्ट) एका ठिकाणी टाकून मुख्य भिंत (वॉल) दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात आहे. हा तांत्रिक घोळ उघडकीस आल्यानंतर, कंत्राटदाराने आपली चूक लपवण्यासाठी राफ्ट 'टाचे मारून' (पॅचवर्क करून) वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मूळ रचनेत नसताना केवळ असे थापे मारून वाढवलेला राफ्ट भविष्यात ४० ते ८० टनांची जड वाहने कशी पेलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकल्पावर देखरेख ठेवणाऱ्या कन्सल्टन्सी आणि सरकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराशी आर्थिक साटेलोटे केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. डिझाइन आणि मानांकनांची पायमल्ली होत असतानाही, कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कामाला 'ओके' प्रमाणपत्र दिल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज जड वाहनांची मोठी वर्दळ असते. नुकत्याच झालेल्या पावसात तात्पुरते रस्ते वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, मुख्य पुलांचे बांधकामच पोकळ आणि नियमबाह्य असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या निकृष्ट कामाची तातडीने तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समोरासमोर आले. आज विधानसभेत तीन तलाकचा मुद्दा प्रकर्षाने गाजला. यावेळी भाजपचे जेष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीन तलाकच्या मुद्द्यांवर जोरदारपणे भाष्य केले. मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगचा वापर करत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.
    1
    महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समोरासमोर आले. आज विधानसभेत तीन तलाकचा मुद्दा प्रकर्षाने गाजला. यावेळी भाजपचे जेष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीन तलाकच्या मुद्द्यांवर जोरदारपणे भाष्य केले. मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगचा वापर करत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दि. २१ जून रोजी उमरेड तालुक्यातील बेला येथील राजेंद्र इंग्लिश प्रायमरी हायस्कूल (राम मंदिराच्या जवळ) येथे लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था, भिवापूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान, शस्त्रक्रिया नोंदणी आणि रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिलीप कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था, भिवापूरचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांची सेवा करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. बेला जिल्हा परिषद क्षेत्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मोठ्या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृद्ध माता-भगिनी, शेतकरी बांधव, लहान मुले आणि युवक मोठ्या आशेने शिबिरात सहभागी झाले. अनेक नागरिकांनी पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेतली, हीच या उपक्रमाची खरी ताकद आणि समाधान असल्याचे नमूद करण्यात आले. या महाआरोग्य शिबिरात नेत्ररोग, त्रिरोग, बालरोग, नाक-कान-घसा, अस्थी रोग, त्वचारोग आणि श्वासविकार यांसारख्या विविध रोगांवर तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विविध शस्त्रक्रियांसंदर्भात नोंदणीही करण्यात आली. गरजू रुग्णांची पुढील उपचारांसाठी नोंदणी केली गेली. या शिबिरात एकूण ४०० ते ५०० नागरिकांनी विविध तपासण्यांसाठी नोंदणी केली, तर ९० नेत्ररोग मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात करण्यात येणार आहेत. तसेच, २० रक्तदात्यांनी रक्तदानही केले. समाजसेवा हीच खरी लोकसेवा मानत, सामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी सुधीर दिवे, किशोर रेवतकर, माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र सुधीरजी पारवे, भाजपा ज्येष्ठ नेते जयकुमार वर्मा, कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेडचे उपसभापती राजकुमारजी कोहपरे, महेशजी दिवसे, राजेंद्र महाल्ले, ज्ञानेश्वर भोयर, सरपंच ग्रामपंचायत बेला अरुणजी बालपांडे, उपसरपंच ग्रामपंचायत बेला प्रशांत लांबट, अभिनव गोळघाटे, शंकर आंबटकर, सुनील गावंडे, सौ. शालूताई मेंढूले, सौ. कीर्तीताई सुरणकर यांसह मनिष बारापात्रे, शुभम खोडके, राजेंद्र चीपडा, अशोक ठाकरे, सचिन भाकरे, धनराज उपासे, दिलीप नागोसे, सौरभ महाले, प्रशांत नागोसे, अक्षय जयस्वाल, सलमान पठाण, आशाताई मेंढे, प्रमोद गवळी, अभय चोरडिया, कैलास साठवणे, रेखा उरकुडे, मायाबाई आंबटकर, प्रज्ञाताई अवचट, राजेश मरसकोल्हे, राजेंद्र पिसुड्डे, प्रशांत बारापात्रे, नरेश गेडेकर, गजानन घाडगे, नितीन काळे, विवेक तायवाडे, उषा ठाकरे, पंकज रोडे, श्रीराम रोडे, रामराव निकुडे, भूषण घुमडे या सर्व मान्यवरांसह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक आणि विशेषतः मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    1
    दि. २१ जून रोजी उमरेड तालुक्यातील बेला येथील राजेंद्र इंग्लिश प्रायमरी हायस्कूल (राम मंदिराच्या जवळ) येथे लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था, भिवापूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य रोगनिदान, शस्त्रक्रिया नोंदणी आणि रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

दिलीप कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था, भिवापूरचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णांची सेवा करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. बेला जिल्हा परिषद क्षेत्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मोठ्या शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृद्ध माता-भगिनी, शेतकरी बांधव, लहान मुले आणि युवक मोठ्या आशेने शिबिरात सहभागी झाले. अनेक नागरिकांनी पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेतली, हीच या उपक्रमाची खरी ताकद आणि समाधान असल्याचे नमूद करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिरात नेत्ररोग, त्रिरोग, बालरोग, नाक-कान-घसा, अस्थी रोग, त्वचारोग आणि श्वासविकार यांसारख्या विविध रोगांवर तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विविध शस्त्रक्रियांसंदर्भात नोंदणीही करण्यात आली. गरजू रुग्णांची पुढील उपचारांसाठी नोंदणी केली गेली. या शिबिरात एकूण ४०० ते ५०० नागरिकांनी विविध तपासण्यांसाठी नोंदणी केली, तर ९० नेत्ररोग मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात करण्यात येणार आहेत. तसेच, २० रक्तदात्यांनी रक्तदानही केले. समाजसेवा हीच खरी लोकसेवा मानत, सामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

या प्रसंगी सुधीर दिवे, किशोर रेवतकर, माजी आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र सुधीरजी पारवे, भाजपा ज्येष्ठ नेते जयकुमार वर्मा, कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेडचे उपसभापती राजकुमारजी कोहपरे, महेशजी दिवसे, राजेंद्र महाल्ले, ज्ञानेश्वर भोयर, सरपंच ग्रामपंचायत बेला अरुणजी बालपांडे, उपसरपंच ग्रामपंचायत बेला प्रशांत लांबट, अभिनव गोळघाटे, शंकर आंबटकर, सुनील गावंडे, सौ. शालूताई मेंढूले, सौ. कीर्तीताई सुरणकर यांसह मनिष बारापात्रे, शुभम खोडके, राजेंद्र चीपडा, अशोक ठाकरे, सचिन भाकरे, धनराज उपासे, दिलीप नागोसे, सौरभ महाले, प्रशांत नागोसे, अक्षय जयस्वाल, सलमान पठाण, आशाताई मेंढे, प्रमोद गवळी, अभय चोरडिया, कैलास साठवणे, रेखा उरकुडे, मायाबाई आंबटकर, प्रज्ञाताई अवचट, राजेश मरसकोल्हे, राजेंद्र पिसुड्डे, प्रशांत बारापात्रे, नरेश गेडेकर, गजानन घाडगे, नितीन काळे, विवेक तायवाडे, उषा ठाकरे, पंकज रोडे, श्रीराम रोडे, रामराव निकुडे, भूषण घुमडे या सर्व मान्यवरांसह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक आणि विशेषतः मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर असलेल्या नुक्ती गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार उमेश भेंडारे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे. घाटंजी पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पांढरकवडा मार्गावर असलेल्या नुक्ती गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वार उमेश भेंडारे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे. घाटंजी पोलिसांनी या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    6 hrs ago
  • महाराष्ट्राचे राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' आहे. हे गीत महाराष्ट्राचा गौरव करते आणि त्याचा जयजयकार करते.
    1
    महाराष्ट्राचे राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' आहे. हे गीत महाराष्ट्राचा गौरव करते आणि त्याचा जयजयकार करते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वेलतूर येथील नागरिकांनी पावसाला आर्त हाक दिली आहे, कारण ते पावसासाठी हवालदिल झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत पावसाला अक्षरशः हातपाय जोडून येण्याची विनंती केली आहे.
    1
    वेलतूर येथील नागरिकांनी पावसाला आर्त हाक दिली आहे, कारण ते पावसासाठी हवालदिल झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करत पावसाला अक्षरशः हातपाय जोडून येण्याची विनंती केली आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वडकी येथील कृषी केंद्र चालकांनी पुढाकार घेत वरुण राजाला साकडे घातले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने 'धोंडी धोंडी पाणी दे...' असा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली आणि गजाननाला पावसासाठी प्रार्थना केली. या मिरवणुकीत कृषी केंद्र चालकांसह शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गांवरून ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवळ यावी आणि खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, यासाठी वरुण राजासह गजाननाला प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीनंतर वडकी बस स्थानक परिसरात उपस्थित नागरिक व प्रवाशांसाठी भोजनदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'अन्नदाता सुखी राहावा, शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद यावा आणि पावसाने सर्व संकटे दूर करावीत,' अशी भावना व्यक्त करण्यात आली, कारण शेतकऱ्यांसाठी पाऊस केवळ पाणी नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. बियाणे आणि खतांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा असून, विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी केंद्र चालकांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता शेतकरी बांधवांच्या समस्येशी जोडलेली सामाजिक भावना या उपक्रमातून दाखवून दिली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे वडकी परिसरात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. निसर्गाच्या कृपेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
    1
    राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर वडकी येथील कृषी केंद्र चालकांनी पुढाकार घेत वरुण राजाला साकडे घातले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने 'धोंडी धोंडी पाणी दे...' असा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली आणि गजाननाला पावसासाठी प्रार्थना केली.

या मिरवणुकीत कृषी केंद्र चालकांसह शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख मार्गांवरून ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. लवकरात लवकर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात हिरवळ यावी आणि खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, यासाठी वरुण राजासह गजाननाला प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीनंतर वडकी बस स्थानक परिसरात उपस्थित नागरिक व प्रवाशांसाठी भोजनदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'अन्नदाता सुखी राहावा, शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा आनंद यावा आणि पावसाने सर्व संकटे दूर करावीत,' अशी भावना व्यक्त करण्यात आली, कारण शेतकऱ्यांसाठी पाऊस केवळ पाणी नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे.

बियाणे आणि खतांची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा असून, विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृषी केंद्र चालकांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता शेतकरी बांधवांच्या समस्येशी जोडलेली सामाजिक भावना या उपक्रमातून दाखवून दिली. या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे वडकी परिसरात एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. निसर्गाच्या कृपेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आज, २२ जून रोजी चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे अवघ्या काही वेळातच संपूर्ण शहर जलमय झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाई मोहीम राबवली होती, मात्र या जोरदार पावसाने त्यांच्या सर्व तयारीचा फुगा फोडला. यामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व नाले सफाईच्या दाव्यांची आज पोलखोल झाली.
    1
    आज, २२ जून रोजी चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे अवघ्या काही वेळातच संपूर्ण शहर जलमय झाले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाई मोहीम राबवली होती, मात्र या जोरदार पावसाने त्यांच्या सर्व तयारीचा फुगा फोडला. यामुळे मनपाच्या मान्सूनपूर्व नाले सफाईच्या दाव्यांची आज पोलखोल झाली.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश एम. भालेराव यांच्या वतीने 'मोटिवेशन ऑफ द डे' सादर करण्यात आले आहे.
    1
    नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश एम. भालेराव यांच्या वतीने 'मोटिवेशन ऑफ द डे' सादर करण्यात आले आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • दिनेश दादा पाटील यांनी सरकारवर सणसणीत प्रहार केला आहे, ज्यात त्यांनी सरकारची दुटप्पी भूमिका उघड केली आहे. पाटील यांच्या मते, सरकार हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवते, परंतु याच वेळी गोरक्षकांना जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. ही परिस्थिती सरकारच्या दुहेरी मापदंडाचे प्रदर्शन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    1
    दिनेश दादा पाटील यांनी सरकारवर सणसणीत प्रहार केला आहे, ज्यात त्यांनी सरकारची दुटप्पी भूमिका उघड केली आहे. पाटील यांच्या मते, सरकार हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवते, परंतु याच वेळी गोरक्षकांना जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. ही परिस्थिती सरकारच्या दुहेरी मापदंडाचे प्रदर्शन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.