महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी नवी दिल्ली, (दि. ३१ जुलै) महाराष्ट्रातील केंद्राच्या ओबीसी यादीत प्रलंबित असलेल्या २७+६ ओबीसी जातींच्या समावेशासह विविध प्रलंबित ओबीसी प्रश्नांसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनच्या शिष्टमंडळाने २९ ते ३१ जुलै या कालावधीत नवी दिल्लीत विविध केंद्रीयमंत्री, खासदार, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदने सादर केली. या दौऱ्यात प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होत महत्त्वपूर्ण आश्वासने मिळाल्याने हा दौरा यशस्वी ठरल्याचे समितीने सांगितले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी (दि. २९ जुलै) केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री बी. एल.वर्मा, डॉ.भागवत कराड, लोकसभा ओबीसी वेल्फेअर समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश सिंह, राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाच्या सदस्या किरणताई महल्ले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार हेमंत विष्णुजी सावरा, अमर काळे, उज्ज्वल निकम, डॉ.प्रशांत पडोळे, दर्शनसिंह चौधरी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी आमदार परिणय फुके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी (दि.३० जुलै) सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंत्रालयाचे संयुक्त सचिव (IAS) डॉ. प्रवीण कुमार थिंड, संचालक (OBC Wing) गौरव सिंह राजावत (IAS) तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशाच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रस्तावाचा केंद्रीय मंत्रिमंडळासाठी (Cabinet Note) मसुदा तयार करून पुढील प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यानंतर राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाच्या सदस्या किरणताई महल्ले व वरिष्ठ सल्लागार राजेश यादव यांच्यासोबत प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. राज्य शासनाकडून आवश्यक त्रुटींची पूर्तता होताच पुढील कार्यवाही गतीने करण्यात येईल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सदन येथे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला सहभोजनासाठी आमंत्रित केले. यावेळी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली असून प्रलंबित विषय लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी (दि. ३१ जुलै) शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अशोक चव्हाण, विनोद तावडे, आमदार चरणसिंह ठाकूर, माजी आमदार सुधाकर कोहळे यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र सदन येथे खासदार उज्ज्वल निकम यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची लवकरच भेट आयोजित करून प्रलंबित विषयांवर पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. महाराष्ट्र ओबीसी कृती समितीने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींचा केंद्राच्या ओबीसी यादीत समावेश होईपर्यंत हा पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार असून, ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात डॉ. नामदेव राऊत, श्रावण फरकाडे, मधुकर चोपडे, मोरेश्वर भादे, कृष्णकुमार डोबले, अर्पण बिसेन, मुकुंद मुसळे यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे ४० पदाधिकारी सहभागी झाले होते.

- अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!1
- NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,1
- "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma1
- एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.1
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1