logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डबल उप महाराष्ट्र केसरी वेदिका सासणे कोल्हापूर यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कुस्ती खेळ जपण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे मनोगत चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल उप महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या वेदिका सासणे कोल्हापूर यांनी व्यक्त केले. ते कुस्तीगीर टीम समवेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेदिका सासणे बोलत होते.* याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंबर पुजारी, प्रवीण घाडगे, सरफराज शेख, कोल्हापूर येथील कुस्ती पंच दादा लवटे, महिला कुस्तीगीर-स्वाती शिंदे, अपेक्षा पाटील, प्राजक्ता बारड, सृष्टी कोरे, पुजा पाटील, तन्वी मगदूम, गौरी पाटील, नंदिनी सोनवणे, अस्मिता पाटील यांच्यासह श्री क्षेत्र अक्कलकोटचे वैभव नवगिरे, निखिल पाटील, एस.के स्वामी, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, शरद भोसले, अनिल बिराजदार, सुमित घाडगे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, कल्याण देशमुख,विनायक भोसले, किरण साठे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

6 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
a2fdcf56-2d62-4428-b194-6da94e1511cd

डबल उप महाराष्ट्र केसरी वेदिका सासणे कोल्हापूर यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कुस्ती खेळ जपण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्याचे मनोगत चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत डबल उप महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या वेदिका सासणे कोल्हापूर यांनी व्यक्त केले. ते कुस्तीगीर टीम समवेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वेदिका सासणे बोलत होते.* याप्रसंगी न्यासाचे पुरोहित विश्वंबर पुजारी, प्रवीण घाडगे, सरफराज शेख, कोल्हापूर येथील कुस्ती पंच दादा लवटे, महिला कुस्तीगीर-स्वाती शिंदे, अपेक्षा पाटील, प्राजक्ता बारड, सृष्टी कोरे, पुजा पाटील, तन्वी मगदूम, गौरी पाटील, नंदिनी सोनवणे, अस्मिता पाटील यांच्यासह श्री क्षेत्र अक्कलकोटचे वैभव नवगिरे, निखिल पाटील, एस.के स्वामी, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, शरद भोसले, अनिल बिराजदार, सुमित घाडगे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, कल्याण देशमुख,विनायक भोसले, किरण साठे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    1
    लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर,
लातूर मनपा  चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक  अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    15 hrs ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    16 hrs ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    4
    *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही  रेल्वे स्टेशन.वर 
वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही  येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----
    1
    ---
(प्रतिनिधी):-  बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-----
“रात्री पाणी देताना जीव धोक्यात”
---
सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली.
-----
सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. 
---
डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
-----
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.