घोसला व नांदगाव तांडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा... सोयगाव तालुक्यातील घोसला व नांदगाव तांडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त घोसला व नांदगाव तांडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जाणून घेत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला उजाळा दिला. मराठवाडा मुक्ती संग्राम हा हैदराबाद संस्थानातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी झालेला ऐतिहासिक लढा होता. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम पार पडला. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सामाजिक एकोपा, विकास आणि राष्ट्रप्रेमाची भावना जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सारथी महाराष्ट्राचा सोयगाव तालुका प्रतिनिधी – किशोर खैरनार

- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS #AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate1
- विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.4
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टाकलेला कचरा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला स्वच्छ तालुक्यातील भवन ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील कचरा स्वच्छ करण्यात आला सदरील कचरा भवन ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छ करण्यात आला1