शिक्रापूरात श्री सेवालाल महाराज जयंती महोत्सव संपन्न शिक्रापूर ता. शिरुर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त बंजारा बांधवांच्या वतीने आयोजित सदर सोहळ्याने संपूर्ण परिसर ढोल ताशांच्या दणदणाट व जयघोषांच्या निनादात पार पडत असताना पारंपरिक वेशभूषेतील स्त्री पुरुषांची उपस्थिती आणि संतांच्या प्रतिमेस अर्पण केलेली पुष्पांजली यामुळे वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेले तर यावेळी बंजारा समाजाची संस्कृती हीच त्यांची ओळख असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे यांनी केले आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य रामभाऊ सासवडे, माजी सरपंच जयश्री भुजबळ, माजी उपसरपंच त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, सयाजी शिंदे, ह.भ.प. गणपत महाराज, विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड यांनी बंजारा समाजाच्या वैभवशाली इतिहासाचा, समृद्ध परंपरांचा आणि संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा वेध घेत सेवालाल महाराजांनी दिलेल्या नैतिकता, सदाचार व समाजजागृतीच्या संदेशाचे स्मरण उपस्थितांना करून दिले. तर बंजारा समाजाची संस्कृती हीच त्यांची ओळख असल्याचे सांगत ती जतन करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे यांनी केले, याप्रसंगी डॉ. श्वेता राठोड यांची एम.डी. मेडिसिनसाठी उत्तम गुणांनी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला तर सेजल चव्हाण या चिमुकलीने पारंपरिक वेशभूषेत भाषण सादर करत उपस्थितांची मने जिंकली, सदर सोहळा यशस्वी होण्यासाठी संतोष पवार, संतोष आडे, रामेश्वर राठोड, डॉ. सचिन राठोड, डॉ. विनीत राठोड, उपअभियंता सतीश पवार, हरीश आडे, संजय राठोड, शिवाजी राठोड, सचिन पवार यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले असून यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश चव्हाण यांनी केले तर प्रा. दिलीप पवार यांनी आभार मानले.

- रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.1
- पुण्यातील बिगवन परिसरातील1
- पुणे : मोहम्मदवाडी परिसरातील तीन गुंठा जागेच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश थोरात यांनी सदर जागेचे खरेदीखत बंद असतानाही विसर पावतीद्वारे व्यवहार सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधित जागेवर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात येत असून, मूळ मालकाव्यतिरिक्त इतर व्यक्तींचे वर्चस्व सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल प्रकारे त्रास दिला जात असल्याचे सांगत अनेक तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी पुणे पोलीस आयुक्त अमितजी कुमार यांच्याकडे धाव घेतली असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरण गंभीर असून प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.1
- पुणे करांचा बहु चरचिंत रिंग रोड लवकरच पूर्णतःवास येणार जोरात काम सुरु सर्व अपडेट लवकरच आपल्या समोर येतील1
- Post by Prasad Panchal1
- २२ महिलांची सुटका... बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- वांबोरी परिसरातील डोंगरगण घाटात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.1
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1