तासगाव : शहरातील एका २९ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विनायक सुधीर गुरव (वय ३५) याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ सप्टेंबररोजी दुपारी पीडित महिला घरात असताना संशयित विनायक गुरव याने घरात अचानक प्रवेश केला. त्याने महिलेला पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला. तासगाव येथे महिलेवर हल्ला, विनयभंग तासगाव : शहरातील एका २९ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विनायक सुधीर गुरव (वय ३५) याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ सप्टेंबररोजी दुपारी पीडित महिला घरात असताना संशयित विनायक गुरव याने घरात अचानक प्रवेश केला. त्याने महिलेला पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला जमिनीवर पाडून मारहाण केली व शिवीगाळ केली. यानंतर महिलेने त्याला बाजूला ढकलले असता, त्याने तिच्या पोटावर पायाने मारहाण करून दुखापत केली आणि तेथून पसार झाला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनायक गुरव याच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तासगाव : शहरातील एका २९ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विनायक सुधीर गुरव (वय ३५) याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ सप्टेंबररोजी दुपारी पीडित महिला घरात असताना संशयित विनायक गुरव याने घरात अचानक प्रवेश केला. त्याने महिलेला पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला. तासगाव येथे महिलेवर हल्ला, विनयभंग तासगाव : शहरातील एका २९ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विनायक सुधीर गुरव (वय ३५) याच्याविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ सप्टेंबररोजी दुपारी पीडित महिला घरात असताना संशयित विनायक गुरव याने घरात अचानक प्रवेश केला. त्याने महिलेला पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला जमिनीवर पाडून मारहाण केली व शिवीगाळ केली. यानंतर महिलेने त्याला बाजूला ढकलले असता, त्याने तिच्या पोटावर पायाने मारहाण करून दुखापत केली आणि तेथून पसार झाला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनायक गुरव याच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* प्रतिनिधी स्वाती हडकर *‘सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक* *रत्नागिरी, दि. १७ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.* पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो." १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.1
- दरबारात आई-वडिलांची आर्त हाक; सुनेत्रावहिनींची तत्काळ दखल, पोलिसांना कारवाईच्या सूचना1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.1
- फेरीवाल्यांच्या हाताला मिळणार आर्थिक बळ! कर्जतमध्ये ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात; पीएम स्वनिधीतून १० ते ५० हजारांपर्यंत कर्जाची सुविधा कर्जत / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपंचायतीच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने शहरातील फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विशेष कर्ज शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फेरीवाले व हातगाडीधारकांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून १० हजार, १५ हजार, २५ हजार आणि पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल उपलब्ध होणार आहे. इच्छाशक्ती असेल तर यश नक्की’ : छाया शेलार नगराध्यक्षा सौ. छाया शेलार यांनी शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. “शासनाच्या अनेक योजना आहेत; मात्र माहितीअभावी त्याचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आम्ही योजना तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत पद्धतीने सन्मानाने व्यवसाय करा. इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर यश नक्कीच मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.2
- डोळ्यात अंजन घालून बघण्यासारखा खूप अप्रतिम व्हिडिओ कृतज्ञता सदगुरुराया, तुम्ही आम्हाला देव पाहण्याची आणि तो अनुभवण्याची दृष्टी दिली1
- खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेडमध्ये मनसेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली प्रतिनिधी/स्वाती हडकर खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेडच्या वतीने भरणे येथील काळकाई मंदिर हॉलमध्ये बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रत्नागिरी जिल्हा संघटक तथा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनिष विलास पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. खेड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस रत्नागिरी जिल्हा सचिव सचिन राजाराम गायकवाड, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष मंगेश सिताराम चाळके, बहुतुक सेना तालुका अध्यक्ष शशिकांत (पप्पू) आंबे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.3
- बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार1