बेपत्ता जवानाचा मृतदेह रुग्णालयात; तपासात पोलिसांची हलगर्जीपणा? तळेगाव दाभाडेतील घटना उघड; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आणि सीआरपीएफमध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे कार्यरत असलेले जवान प्रशांत कदम यांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर त्यांचा मृतदेह रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना वेळेवर न मिळाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशांत कदम हे २५ मार्च रोजी ड्युटीवर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर त्यांनी लोणावळा येथून पुन्हा तळेगावच्या दिशेने परत येत कोणालाही काही माहिती दिली नाही. याचदरम्यान त्यांचा मोबाईलही बंद होता, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्याच दिवशी रात्री सोमाटणे फाटा परिसरात, हॉटेल अंगण समोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ‘अनोळखी मृतदेह’ म्हणून करण्यात आली. विशेष म्हणजे, याच काळात प्रशांत कदम बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच पोलीस ठाण्यात दिली होती. तरीही या दोन्ही घटनांचा ताळमेळ लावून तात्काळ तपास करण्यात आला नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे. घटनेनंतर दोन ते तीन दिवस कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध सुरू होता. मात्र, अखेर पोलिसांकडून नव्हे, तर मित्रांच्या माध्यमातून प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. ही माहिती समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.एकीकडे बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि दुसरीकडे अनोळखी मृतदेहाची नोंद असताना देखील पोलिसांनी तात्काळ तपास करून ओळख पटवली नाही, यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर घटनांमध्ये पोलिसांनी अधिक संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करणे अपेक्षित असते.या संपूर्ण घटनेमुळे तळेगाव परिसरात नाराजी व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3
- पुण्यात पावसाचा तडाका पुणेकर गाराठले भर उन्हात पावसाचा तडाका1
- Post by Kishor subhash jadhav1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- आठवले साहेबांच्या आदेशाने निवडणुकीत काम केलं 'आरपीआय वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख1