logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञानाची गुरुकिल्ली आहे - डॉ. रामप्रसाद लखोटिया *इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञानाची गुरुकिल्ली – डॉ. रामप्रसाद लखोटिया* उदगीर : आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगाशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी इंग्रजी हीच प्रमुख भाषा असून तीच जागतिक ज्ञानाची गुरुकिल्ली बनली आहे, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने बी.ए. तृतीय वर्ष व एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार उपस्थित होते. व्यासपीठावर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी, प्रा. राजा मुदूडगे, प्रा. प्रविण अंबेसंगे, प्रा. व्ही. डी. काकनाळे, प्रा. ए. सी. बिरादार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी यांनी करून दिला तसेच इंग्रजी विभागामार्फत ‘कम्युनिकेशन अँड स्पोकन इंग्लिश’ या उपक्रमांतर्गत नियमित वर्ग तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करावी, अशी माहिती सांगितली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार म्हणाले, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि जागतिक स्तरावर प्रगती साधण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजी आत्मसात करून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा. यावेळी लिटररी असोसिएशनच्या वतीने भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बी.ए. द्वितीय वर्षातील कु. ऋतुजा कप्ते व कु. आसावरी अपसिंगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. क्षीरसागर अभिजीत व विशाल कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात डॉ. लखोटिया यांनी विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात सातत्याने परिश्रम घेऊन या भाषेवर प्रभुत्व मिळविल्यास शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात यश मिळविणे अधिक सुलभ होते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजयालक्ष्मी प्रसन्ने यांनी केले, तर आभार प्रा. शिवनंदा रोडगे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. प्रवीण अंबेसंगे, प्रा. बालाजीप्रसाद घाळे, प्रा. विजयालक्ष्मी प्रसन्ने, प्रा. शिवनंदा रोडगे, प्रा. शादूल शेख यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
238a1a34-f496-4ef0-8589-a9c495280b19

More news from Maharashtra and nearby areas
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    1
    शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    1
    Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    1
    खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा
हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो 
आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे 
दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो 
#RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.