बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी - उच्च शिक्षण महासंचालक डॉक्टर बाबासाहेब भोसले *बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी.* *उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. बाबासाहेब भोसले* देगलूर:- जिल्हा नांदेड प्रतिनिधी अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाचा नावलौकिकाबद्दल मी विविध ठिकाणी ऐकले आहे, आज या महाविद्यालयाच्या भव्य व रमणीय परिसरात ते साक्षात दिसुन येत आहे. येथील शैक्षणिक पर्यावरण विद्यार्थ्यांच्या जडणघडणसाठी व सर्वांगीण विकासासाठी उत्तम आहे. तसेच या महाविद्यालयाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा हा समृद्ध असून त्या बळावर वर्तमानात प्रस्तुत महाविद्यालयाने दर्जेदार विद्यार्थ्यी घडविण्यात मोलाचं योगदान दिले आहे, असे उद्गार नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले यांनी काढले. ते देगलूर महाविद्यालयास सदिच्छा भेट देन्यासाठी आले होते. भेटीदरम्यान महाविद्यालय परिसरातील डिजिटल क्लास रूम, संगणक कक्ष, भव्य मैदान, ग्रंथालय, विविध प्रयोग शाळा इत्यादी भौतिक अद्यावत सुविधा पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयांतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक सुविधांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधला . पुढे ते म्हणाले,’बदलत्या काळानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आत्मीयता जपावी आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. कालसुसंगत परिवर्तनीय भूमिका ठेवून वाटचाल करावी’ नवीन व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु कारावेत असा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. विठ्ठल जंबाले, डॉ. अशोक टिपरसे, डॉ विनय भोगले , यांच्या सह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बी आर कतूरवार यानी केले.

- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत मिनी सरस रेणुका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर हा भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा भरवला जाणार असून, दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तो नागरिकांसाठी खुला राहील1
- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- ⚡ उपोषणाचा तिसरा दिवस… आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आज माझ्या उपोषण स्थळी एक ६५ वर्षांच्या आजी भेटायला आल्या. महावितरणकडून होत असलेल्या त्रासामुळे त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडू लागल्या. सामान्य गोरगरीब नागरिकांना वीज बिल, कनेक्शन व इतर समस्यांमुळे किती हाल सहन करावे लागत आहेत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. एमएसईबी महावितरणच्या प्रांगणातच एका वृद्ध मायेला अश्रू ढाळावे लागतात, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. जोपर्यंत गोरगरीब वीज ग्राहकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. #Mahavitaran #Himayatnagar #Uposhan #ElectricityIssues #CommonPeople #JusticeForConsumers #NandedNews #MaharashtraNews #PublicVoice ⚡1
- Post by Nanded_71
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4