logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी डीवायएसपी अरविंद रायबोले यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांनी अहमदपूर उपविभागात अवैध धंद्याची साखळी तोडण्याचे काम हाती घेतले असून, यापूर्वीही अवैध दारू वाहतूक, वाळू वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतल्याची चर्चा असून, त्यांना 'गुन्हेगारांचे कर्दनकाळ' म्हणून ओळखले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, डीवायएसपी अरविंद रायबोले यांच्या थेट आदेशावरून, ३० मे रोजी दुपारी सव्वातीन वाजता मौजे उजना येथील शेत शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाडसी छापा टाकला. खंडाळी गावाजवळ गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे, पोलीस हवालदार अभिमन्यू रेचेवाड आणि पोलीस नायक धरमपाल गुट्टे यांनी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत ही माहिती पडताळून पाहिली. मौजे उजना येथील आनंद रमेश मोटरवार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत पैशांवर तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना बोलावून दुपारी तीन ते सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना रंगेहात अटक केली. यात उजना येथील बालाजी निवृत्ती मासुळे, शेख दस्तगीर वजीर साहब, शेख चांद फरीद साहब, दिलीप अण्णाराव परतवाघ, उद्धव एकनाथ बारवाड, शेख नयुम लालू साहब, शेख मेहबूब मस्तान यांचा समावेश आहे. तसेच, गंगाहीप्परगा येथील गंगाधर ज्ञानोबा गायकवाड आणि कंधार तालुक्यातील कुरळा येथील संतोष संभाजी मुस्कावड या दोन बाहेरगावातील आरोपींनाही अटक करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चार मोटारसायकली (एक होंडा युनिकॉर्न, तीन होंडा शाईन) आणि एक बोलेरो जीप असा एकूण १२ लाख ४५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेले अँड्रॉइड मोबाईल आणि रोख रक्कम देखील आहे. पोलीस हवालदार अभिमन्यू रेचवडे यांनी जप्त पंचनामा करून सर्व मुद्देमाल तपासकामी ताब्यात घेतला आहे. सर्व आरोपींना इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे यांच्या फिर्यादीवरून सर्व नऊ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अहमदपूर परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आता संपूर्ण उपविभागात सुरू आहे.

2 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
b08c35d2-e6f4-4c74-81ed-0ff51b4356a1

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर उपविभागाचे पोलीस अधिकारी डीवायएसपी अरविंद रायबोले यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यांनी अहमदपूर उपविभागात अवैध धंद्याची साखळी तोडण्याचे काम हाती घेतले असून, यापूर्वीही अवैध दारू वाहतूक, वाळू वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतल्याची चर्चा असून, त्यांना 'गुन्हेगारांचे कर्दनकाळ' म्हणून ओळखले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, डीवायएसपी अरविंद रायबोले यांच्या थेट आदेशावरून, ३० मे रोजी दुपारी सव्वातीन वाजता मौजे उजना येथील शेत शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाडसी छापा टाकला. खंडाळी गावाजवळ गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे, पोलीस हवालदार अभिमन्यू रेचेवाड आणि पोलीस नायक धरमपाल गुट्टे यांनी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत ही माहिती पडताळून पाहिली. मौजे उजना येथील आनंद रमेश मोटरवार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत पैशांवर तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी तात्काळ दोन पंचांना बोलावून दुपारी तीन ते सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना रंगेहात अटक केली.

b3f7a837-5ed7-4704-b53e-7dc0c12ee105

यात उजना येथील बालाजी निवृत्ती मासुळे, शेख दस्तगीर वजीर साहब, शेख चांद फरीद साहब, दिलीप अण्णाराव परतवाघ, उद्धव एकनाथ बारवाड, शेख नयुम लालू साहब, शेख मेहबूब मस्तान यांचा समावेश आहे. तसेच, गंगाहीप्परगा येथील गंगाधर ज्ञानोबा गायकवाड आणि कंधार तालुक्यातील कुरळा येथील संतोष संभाजी मुस्कावड या दोन बाहेरगावातील आरोपींनाही अटक करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चार मोटारसायकली (एक होंडा युनिकॉर्न, तीन होंडा शाईन) आणि एक बोलेरो जीप असा एकूण १२ लाख ४५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आरोपींच्या अंगझडतीतून मिळालेले अँड्रॉइड मोबाईल आणि रोख रक्कम देखील आहे. पोलीस हवालदार अभिमन्यू रेचवडे यांनी जप्त पंचनामा करून सर्व मुद्देमाल तपासकामी ताब्यात घेतला आहे. सर्व आरोपींना इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लक्ष्मण कांबळे यांच्या फिर्यादीवरून सर्व नऊ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अहमदपूर परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आता संपूर्ण उपविभागात सुरू आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    1
    राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    1
    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.
    1
    संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.
    1
    खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.
    user_Abn news
    Abn news
    Media company Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
    1
    परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 'जनसंवाद' उपक्रमांतर्गत नांदेड येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्हा पोलीस कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात एकूण ३७ तक्रारदारांनी आपले अर्ज सादर केले. यावेळी मालमत्ता वाद, हरवलेली इसम, सायबर फसवणूक, गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारी मांडण्यात आल्या. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, तक्रारींच्या प्रभावी निपटाऱ्यासाठी 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली असून प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे. पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    1
    नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 'जनसंवाद' उपक्रमांतर्गत नांदेड येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्हा पोलीस कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात एकूण ३७ तक्रारदारांनी आपले अर्ज सादर केले.

यावेळी मालमत्ता वाद, हरवलेली इसम, सायबर फसवणूक, गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारी मांडण्यात आल्या. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, तक्रारींच्या प्रभावी निपटाऱ्यासाठी 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली असून प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे.

पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
    1
    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.