logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

112 वर फोन करून एका महिलेचे प्राण वाचवले, पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे दुर्घटना टळली डायल 112 वर मिळालेल्या फोनला तत्काळ प्रतिसाद; महिलेचे प्राण वाचले. लातूर (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनःस्थितीत असलेल्या एका महिलेचे प्राण डायल 112 वर मिळालेल्या फोनमुळे पोलिसांच्या तत्पर कारवाईने वाचले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेत तिचे समुपदेशन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. संबंधित महिला कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादामुळे बनशेळकी धरण परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती डायल 112 वर प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथील कर्तव्यावरील पोलीस अंमलदार फारूख शेख यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सदर महिला टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने तिला सुरक्षित ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेचे पती व भाऊ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक परिस्थिती, मानसिक तणाव आणि निर्माण झालेल्या गैरसमजुतींबाबत तिच्याशी संवाद साधत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्या बाबत समज देण्यात आली. सदर महिला गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. प्रकृती अस्वस्थ असतानाही पतीने तिची विचारपूस केली नसल्याच्या कारणावरून तिला राग आला होता. त्यातून भावनिक होऊन तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिच्या सविस्तर जबाबातून समोर आले. पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून आवश्यक ती कार्यवाही केली आणि अखेर तिला तिच्या भावाच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी डायल 112 वर मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या प्रत्येक फोन कॉलची गांभीर्याने दखल घेऊन त्याची शहानिशा करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच डायल 112 ड्युटीवरील अधिकारी व अंमलदारांना दिल्या आहेत. केवळ फोनवर माहिती घेऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेणे, आवश्यक ती मदत करणे, प्रकरणाचा पाठपुरावा करणे आणि त्याची योग्य पद्धतीने निर्गती करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. याच सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करत डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीवर कर्तव्यावरील पोलीस अंमलदाराने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. पोलिसांच्या या तत्पर प्रतिसादामुळे एका महिलेचे अमूल्य प्राण वाचले, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. डायल 112 ही केवळ आपत्कालीन मदतीची सेवा नसून, संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास धोका असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ डायल 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

1 day ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago

112 वर फोन करून एका महिलेचे प्राण वाचवले, पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे दुर्घटना टळली डायल 112 वर मिळालेल्या फोनला तत्काळ प्रतिसाद; महिलेचे प्राण वाचले. लातूर (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या मनःस्थितीत असलेल्या एका महिलेचे प्राण डायल 112 वर मिळालेल्या फोनमुळे पोलिसांच्या तत्पर कारवाईने वाचले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेत तिचे समुपदेशन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. संबंधित महिला कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादामुळे बनशेळकी धरण परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती डायल 112 वर प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथील कर्तव्यावरील पोलीस अंमलदार फारूख शेख यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सदर महिला टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने तिला सुरक्षित ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेचे पती व भाऊ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक परिस्थिती, मानसिक तणाव आणि निर्माण झालेल्या गैरसमजुतींबाबत तिच्याशी संवाद साधत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्या बाबत समज देण्यात आली. सदर महिला गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. प्रकृती अस्वस्थ असतानाही पतीने तिची विचारपूस केली नसल्याच्या कारणावरून तिला राग आला होता. त्यातून भावनिक होऊन तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिच्या सविस्तर जबाबातून समोर आले. पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून आवश्यक ती कार्यवाही केली आणि अखेर तिला तिच्या भावाच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी डायल 112 वर मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या प्रत्येक फोन कॉलची गांभीर्याने दखल घेऊन त्याची शहानिशा करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच डायल 112 ड्युटीवरील अधिकारी व अंमलदारांना दिल्या आहेत. केवळ फोनवर माहिती घेऊन थांबण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची माहिती घेणे, आवश्यक ती मदत करणे, प्रकरणाचा पाठपुरावा करणे आणि त्याची योग्य पद्धतीने निर्गती करणे, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. याच सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करत डायल 112 वर प्राप्त झालेल्या माहितीवर कर्तव्यावरील पोलीस अंमलदाराने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. पोलिसांच्या या तत्पर प्रतिसादामुळे एका महिलेचे अमूल्य प्राण वाचले, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. डायल 112 ही केवळ आपत्कालीन मदतीची सेवा नसून, संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास धोका असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ डायल 112 वर माहिती द्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • 🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त 📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६ नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 💰 दारू : ₹१,०१,७९० 🚗 कार : ₹५ लाख 📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९० या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes #nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded
    1
    🚨 Nanded Crime | अवैध विदेशी दारू वाहतुकीवर नायगाव पोलिसांचा छापा; ₹६.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त
📍नायगाव | २७ ऑगस्ट २०२६
नायगाव परिसरात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत ४७७ बाटल्या विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ₹६,०१,७९० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वडजे हॉस्पिटलजवळ पोलिसांनी सापळा रचून MH-12-NJ-2346 क्रमांकाची कार तपासली असता विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
या प्रकरणी विशाल बहादुरमल भंडारी, संजय शंकर बानेवाड आणि गणेश उर्फ गणपती गोविंदराव जाधव यांच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(अ) व ६५(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💰 दारू : ₹१,०१,७९०
🚗 कार : ₹५ लाख
📦 एकूण मुद्देमाल : ₹६,०१,७९०
या कारवाईबद्दल तुमचं मत काय? कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NandedCrime #Naigaon #NandedPolice #PoliceAction #MaharashtraNews #NandedUpdates #NandigramTimes
#nandedfirstnews #shaikhjahurdudhadkar #NandedUpdates #nanded
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस
    1
    ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली?
७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली?
हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे.
शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही!
या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर
#रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    1
    🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!

शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾

“आपली जमीन, आपला हक्क!”



🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध!
शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾
“आपली जमीन, आपला हक्क!”
शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪
#खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    1
    शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
शेख फयाज शेख शब्बीर यांची 
शिवसेना अल्पसंख्याक पाथरी 
विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.
    1
    DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं?
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा.
DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं?
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा.
या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.
📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर
🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६
अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा.
📞 संपर्क : 08805974164
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.
    user_आप्पा भगवान सिरसाठे
    आप्पा भगवान सिरसाठे
    Newspaper publisher उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    1
    वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट
वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    9 hrs ago
  • सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते. नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन
स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत.
या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. 
नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व
कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. 
या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि
आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार  गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी
स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, 
प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    1
    🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा
📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे.
📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा.
☎️ 02462-235077
☎️ 1077 — टोल फ्री
माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.