logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या खंडणी विरोधी पथक-२ ने एका मोठ्या कारवाईत सोशल मीडियावरून अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लातूर येथून अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १,९८,५०० रुपये किमतीचे ५ गावठी पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख अहमद उर्फ बबलु सुरज सय्यद (वय २० वर्षे, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे आहे. हा आरोपी पुणे शहरातील पर्वती पोलीस स्टेशन (गु.र.नं. ८१/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५)), खडक पोलीस स्टेशन (गु.र.नं. १७१/२०२६ भा.न्या.सं. कलम १०९) आणि वाघोली पोलीस स्टेशन (गु.र.नं. १७४/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५)) येथील विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे होता. खंडणीविरोधी पथक-२ आरोपीचा शोध घेत असताना, तो लातूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. या माहितीची शहानिशा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एक विशेष टीम लातूर येथे पाठवण्यात आली. पथकाने लातूरमधून आरोपी शेख अहमद उर्फ बबलु याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. आरोपीकडे केलेल्या अधिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. हा आरोपी सोशल मीडियावर गावठी पिस्टलसोबत स्वतःचे फोटो काढून ते प्रसारित करत असे आणि पिस्टल व काडतुसांच्या खरेदी-विक्रीसाठी 'इन्स्टाफोन' (इन्स्टाग्राम) वरून संपर्क साधत होता, ज्यामुळे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत होते. आरोपी स्वतः मध्यप्रदेशातील उमरठी गावातील अग्निशस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात होता. तो आपल्या ओळखीच्या लोकांना मध्यप्रदेशात पाठवून आणि स्वतः मध्यस्थी करून गावठी पिस्टल खरेदी करत होता. या कारवाईनंतर खंडणी विरोधी पथकाने वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ गुन्हे आणि येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे १ गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून एकूण ०५ पिस्टल आणि ०७ जिवंत काडतुसे असा ₹१,९८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. यामध्ये पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्रीमती तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. गौहर हसन आणि सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक श्री. राम राजमाने यांच्या नेतृत्वाखालील खंडणी विरोधी पथक-२ मधील सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, पवन भोसले, आझाद पाटील, प्रशांत शिंदे, विनोद महाजन, संजय आढारी, अनिल कुसाळकर, प्रदिप परीट, सुजित वाघमारे, गणेश खरात, नितीन मुंढे, चेतन आपटे, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, साहील शेख, रविंद्र रोकडे, शेखर खराडे, अमोल घावटे आणि अमोल राऊत या पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.

13 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
13 hrs ago
d346983e-41e1-4d11-9725-e71058f6fb4b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्यातील बिबवेवाडी येथे अनिकेत सोसायटीजवळ PMPML बसचा एक्सल तुटून त्याचे चाक बाहेर आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे PMPML प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बसकडे लक्ष दिले जात नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. प्रवाशांना चांगली सुविधा आणि योग्य सेवा का मिळत नाही, तसेच त्यांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या प्रकारामुळे प्रवाशांना काही दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_Vibhav Salkar
    Vibhav Salkar
    City Star पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    1
    पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडजवळच्या प्रसिद्ध घोरवडेश्वर डोंगरावर आज दिवसाढवळ्या एका पट्टेदार तरसाचे दर्शन झाले. काही पर्यटकांनी या वन्यप्राण्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये यशस्वीरित्या कैद केला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घोरवडेश्वर डोंगर हा ट्रेकर्स आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असलेला परिसर आहे. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या तरस दिसल्याने कुतूहलासोबतच नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, एकटे फिरणे टाळण्याचे आणि वन्यजीवांना कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचे आवाहन केले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    1
    मारुती जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रभाग ११ मध्ये प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत. विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    1
    नाशिक विधान परिषद निवडणुकीतील विजयी अपक्ष आमदार गोपाळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ते एका विशेष खासगी विमानाने प्रवास करत असून, उद्योग मंत्री उदय सामंत हे या भेटीमध्ये मध्यस्थी करत आहेत.

विशेष म्हणजे, गोपाळ गिते यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. असे असूनही, पक्षाच्या उमेदवाराला हरवणाऱ्या याच अपक्ष उमेदवारासाठी शिवसेनेकडून पायघड्या घालण्यात आल्या आहेत, असे या वृत्तातून समोर आले आहे.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    1
    परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १८ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नाशिक फाटा पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बसने मागून येऊन दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
    user_जनता न्यूज
    जनता न्यूज
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.