हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन इंदापूर : प्रतिनिधी ता: 15 बातमीदार गणेश कांबळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवा निमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवास स्थानी गणरायाचे दर्शन घेतले व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्ध सिद्धि विनायक, जीएसबी आदी सार्वजनिक गणपती चेही दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवा निमित्त गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवा निमित्त भेट देऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ ' निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, जीएसबी सेवा मंडळ येथे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीकरिता दमदार पावसाची गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी घेतले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन सिद्धिविनायक, जीएसबी गणपतीचेही दर्शन इंदापूर : प्रतिनिधी ता: 15 बातमीदार गणेश कांबळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवा निमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या निवास स्थानी गणरायाचे दर्शन घेतले व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी प्रसिद्ध सिद्धि विनायक, जीएसबी आदी सार्वजनिक गणपती चेही दर्शन घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी गणेशोत्सवा निमित्त गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवेंद्र
फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवा निमित्त भेट देऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ ' निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, जीएसबी सेवा मंडळ येथे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीकरिता दमदार पावसाची गणरायाकडे प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे, युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते.
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- देश भरात लाडक्या बाप्पाचे आगमन चिमुकली आपल्या बाप्पा ला घरी आणताना वायरल...1