यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नागपूरच्या संचालकपदी डॉ. सुर्यवंशी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नागपूरच्या संचालकपदी डॉ. सुर्यवंशी नागपूर, ०१ ऑगस्ट : नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागीय संचालकपदी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. शरद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी त्यांनी मावळते संचालक डॉ. धनंजय वेळुकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी डॉ. पांडुरंग डांगे, डॉ. नितीन जंगीटवार, डॉ. मनोज आंबटकर यांची उपस्थिती होती. डॉ. शरद सुर्यवंशी यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तत्पूर्वी त्यांनी शारीरिक शिक्षण महाविद्यालय कोराडी(तायवाडे कॉलेज) तसेच गुलाब नबी आझाद शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. रमेश धवड शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर येथून त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात केली होती. शारीरिक शिक्षण विषयात आचार्य पदवी घेतलेले डॉ. सूर्यवंशी हे माजी आंतरराष्ट्रीय धावपटू असून वार्सा पोलंड येथे झालेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्वही केले होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये २ सुवर्ण व ५ रौप्य आणि एक कांस्यपदक प्राप्त केले आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणूकीत ते विद्यापीठ प्रातिनिधी म्हणून निवडून आले होते. एनसीसीचे बेस्ट कॅडेट म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त असून राष्ट्रीय शालेय स्पर्धेत त्यांना बेस्ट ॲथलीटचा खिताबही मिळाला होता. अ. भा. आंतर विद्यापीठा क्रॉस कंट्री स्पर्धेचे जेतेपदही त्यांनी प्राप्त केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सुध्दा त्यांनी सांभाळला आहे. नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी नागपूर आणि गोंडवाणा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्य केले. सामाजिक कार्यातही सक्रिय: क्रीडा भारती, मैत्री परिवार संस्था, सुर्या फाउंडेशन आदी संस्थांचे ते सक्रिय सदस्य असून महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे वरिष्ठ सहसचिव म्हणून त्यांनी आपले योगदान दिले आहे. सध्या ते महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या ॲथलीट कमिशनचे समन्वयक असून आत्तापर्यंत त्यांनी ३ आंतरराष्ट्रीय परिसंवादासह अनेक राष्ट्रीय परिसंवादात अभ्यासलेख सादर केले आहे. त्यांनी शारीरिक शिक्षण व प्रशिक्षण पद्धतीवर तीन पुस्तके लिहली असून ‘महिला खेळाडूंची भारतातील स्थिती’ या विषयावरील राष्ट्रीय शोध कार्यात त्यांनी मुख्य संशोधक म्हणून काम केले आहे. अनेक आंतरविद्यापीठ आणि राष्ट्रीय स्पर्धांसह ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनाचा अनुभव त्यांच्या नावे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राची वाटचाल त्यांच्या नेतृत्वात सुरु राहण्यासाठी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.2
- अनेक मान्यवर उपस्थित होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम थाटात संपन्न1
- अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.1
- साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!1
- NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,1
- 'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग 'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग1
- Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F571
- अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.1